ACC U-19 Men's Asia Cup Live Streaming: 'अंडर 19 आशिया कप'ला आजपासुन सुरुवात, भारताची पहिली लढत अफगाणिस्तानशी; जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार Live
भारतीय क्रिकेट संघ आपल्या मोहिमेची सुरुवात अफगाणिस्तानविरुद्ध (IND vs AFG) करेल, तर दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा सामना नेपाळशी होईल. या स्पर्धेतील बहुप्रतिक्षित सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. 10 डिसेंबरला आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ भिडणार आहेत.
एसीसी अंडर-19 पुरुष आशिया चषकाची (ACC U-19 Men's Asia Cup) सुरुवात आजपासून युएई (UAE) मध्ये सुरू होत आहे. भारतीय क्रिकेट संघ आपल्या मोहिमेची सुरुवात अफगाणिस्तानविरुद्ध (IND vs AFG) करेल, तर दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा सामना नेपाळशी होईल. या स्पर्धेतील बहुप्रतिक्षित सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. 10 डिसेंबरला आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ भिडणार आहेत. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होत आहेत. 8 संघांची 2 गटात विभागणी करण्यात आली आहे. भारताला पाकिस्तानसह (IND vs PAK) गट अ मध्ये ठेवण्यात आले आहे ज्यात अफगाणिस्तान आणि नेपाळच्या संघांचाही समावेश आहे. ब गटात बांगलादेश, जपान, श्रीलंका आणि यजमान यूएईचे संघ आहेत. अंडर-19 आशिया चषक (ACCU 19 Mens Asia Cup) फॉरमॅटनुसार, दोन्ही संघांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीचे सामने 15 डिसेंबरला तर अंतिम सामने 17 डिसेंबरला होणार आहेत.
कधी अन् कुठे पाहणार सामना?
भारत अंडर-19 विरुद्ध अफगाणिस्तान अंडर-19 सामना शुक्रवार, 8 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता खेळवला जाईल. हा सामना दुबईतील आयसीसी अकादमी ओव्हल 1 येथे होणार आहे. दरम्यान, आशियाई क्रिकेट परिषद (ACC) च्या देखरेखीखाली ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. कोणत्याही टीव्ही चॅनेलवर ही स्पर्धा दखवली जाणार नाही. परंतु हे सामने एसीसीच्या YouTube चॅनल आणि Asian Cricket Council TV वर मोफत प्रसारित केले जातील. (हे देखील वाचा: WPL 2024 Auction: महिला प्रीमियर लीगचा लिलाव 9 डिसेंबरला होणार मुंबईत, 'या' 6 परदेशी खेळाडूंवर होऊ शकतो पैशांचा पाऊस)
टीम इंडियाचे ग्रुप स्टेजचे वेळापत्रक
भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 8 डिसेंबर (आयसीसी अकादमी ग्राउंड दुबई)
भारत विरुद्ध पाकिस्तान, 10 डिसेंबर (आयसीसी अकादमी ग्राउंड दुबई)
भारत विरुद्ध नेपाळ, 12 डिसेंबर (आयसीसी अकादमी मैदान क्रमांक 2 दुबई)
दोन्ही संघांचे खेळाडू
भारत अंडर-19 संघ : उदय सहारन (कर्णधार), अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर अहमद खान, आराध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी, अरावेली अवनीश (विकेटकीपर), सौम्या पांडे , अभिषेक.मुरुगन, इनेश महाजन, धनुष गौडा
अफगाणिस्तान अंडर-19 संघ : नसीर खान मारूफ खिल (कर्णधार), वफीउल्लाह तरखिल, जमशेद झदरन, खालिद तानिवाल, अक्रम मोहम्मदझई, सोहेल खान जुरमती, रहिमुल्ला जुरमती, नोमान शाह आगा आगा, मोहम्मद युनूस झदरन, अल्लाह मोहम्मद गझनफर, वहीदुल्ला जदरन, बशीर अहमद अफगाण, फरिदून दाऊदझई आणि खलील खलील अहमद
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)