UAE vs USA ODI ICC CWC League 2 2024 Scorecard: अमेरिकेचा संयुक्त अरब अमीरातीवर एकदिवसीय सामन्यात 10 विकेटने शानदार विजय
प्रथम फलंदाजी करताना UAE संघ 31.2 मध्ये 106 धावांवर ऑलआऊट झाला. UAE संघातर्फे राहुल चोप्राने 64 चेंडूत सर्वाधिक 32 धावा केल्या
ICC क्रिकेट विश्वचषक लीग 2 2023-27 चा 27 वा सामना आज म्हणजेच 18 सप्टेंबर रोजी संयुक्त अरब अमिराती राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि युनायटेड स्टेट्स राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात विंडहोक येथील वांडरर्स क्रिकेट मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात आहे. युएईने दिलेले 107 धावांचे आवाहन अमेरिकेने 15.5 षटकांत बिना विकेट गमावता प्राप्त केले आहे. अमेरिकेकडून समित पटेलने 41 चेंडूत 38 धावा तर अँड्रर्यू गोसने 54 चेंडूत 66 धावांची खेळी करत विजय प्राप्त केला आहे. (हेही वाचा - ICC T20I Rankings: आयसीसी टी-20 क्रमवारीत भयानक उलथापालथ, लियाम लिव्हिंगस्टोनने पटकावले अव्वल स्थान)
पाहा पोस्ट -
दरम्यान, अमेरिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना UAE संघ 31.2 मध्ये 106 धावांवर ऑलआऊट झाला. UAE संघातर्फे राहुल चोप्राने 64 चेंडूत सर्वाधिक 32 धावा केल्या. याशिवाय आर्यांश शर्मा 31 धावांवर, कर्णधार मुहम्मद वसीम 2 धावांवर आणि आलिशान शरफू 0 धावांवर बाद झाला. दुसरीकडे, अमेरिकेकडून जसदीप सिंगने 5 षटकांत 18 धावा देत 4 बळी घेतले. याशिवाय सौरभ नेत्रावळकरने 2, नॉस्तुश केंझिगेने 2 आणि मिलिंद कुमारने 2 गडी बाद केले.