U19 World Cup 2020: दिव्यांश सक्सेना च्या डोक्यावर बांग्लादेशी गोलंदाजाने रागात फेकून मारला बॉल, संतप्त Netizens ने लगावली फटकार

चिडलेला दिव्यांश हावभाव करत चालू लागला, पण अंपायरला मध्य येऊन प्रकरण शांत करावे लागले.

(Photo Credit: Twitter)

आयसीसी अंडर 19 विश्वचषक (U19 World Cup) युवा प्रतिभा आणि त्यांच्या आकांशा पूर्ण करणारा एक मंच आहे. मेगा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारत (India) अंडर-19 संघाने उपांत्य फेरीत पाकिस्तानचा 10 विकेटने धुव्वा उडवला, तर बांग्लादेशने (Bangladesh) मोठ्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने जाण्यासाठी न्यूझीलंडला पराभूत केले. सध्या दोन्ही देशांमध्ये विश्वचषकचा फायनल सामना खेळला जात. भारताने पाचव्यांदा, तर बांग्लादेशने पहिल्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. टॉस गमावून पहिले फलंदाजीसाठी आलेल्या भारत अंडर-19 साठी यशस्वी जयस्वाल आणि दिव्यांश सक्सेना (Divyansh Saxena) यांनी डावाची सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी सुरुवातीला मोठे फटके खेळण्याचे टाळत आणि सावध सुरुवात केली. पण, बांग्लादेशी गोलंदाज तंजीम हसन सकीब (Tanzim Hasan Sakib) याच्या एका कृतीमुळे दिव्यांशला राग अनावर झाला. चिडलेला दिव्यांश हावभाव करत चालू लागला, पण अंपायरला मध्य येऊन प्रकरण शांत करावे लागले.

सामन्याच्या दुसर्‍या षटकात बांग्लादेशी साकीबने चेंडू टाकला ज्याच्यवर दिव्यांशने डिफेन्स केला. गोलंदाजाने चेंडू पकडला आणि तत्काळ फलंदाजाच्या दिशेने फेकला ज्यावर फलंदाज दिव्यांशचे डोकं बचावले. त्याने केलेला थ्रो दिव्यांशच्या डोक्याच्या अगदी जवळून गेला यावर भारतीय फलंदाज चिडला. पाहा हा व्हिडिओ:

दिव्यांश-साकीबमध्ये झालेल्या चकमकीवर नेटकरीही भडकले. एक यूजर म्हणाला की साकीबवर गोलंदाजीसाठी बंदी घातली पाहिजे, तर दुसरा म्हणाला की हे खेळाडू वृत्तीच्या विरोधात आहे. पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:

हाहाहा!

क्रिकेटसाठी चांगली चिन्ह नाही!

साकिबकडून खराब क्रिकेट

बरोबर पहात आहे!

गैरसमज

दरम्यान, सेमीफायनलमध्ये अर्धशतक करणारा दिव्यांश आज फायनलमध्ये मोठा डाव खेळू शकला नाही. अविषेक दासने दिव्यांशला 2 धावांवर कॅच आऊट केले आणि पॅव्हिलिअनचा मार्ग दाखवला.