ICC World Cup 2019: IND vs BAN मॅचमध्ये टीम इंडियाच्या ब्लू जर्सीतल्या चांगल्या कामगिरी नंतर ऑरेंज जर्सी पुन्हा Netizens च्या निशाण्यावर
भारतीय टीमने परिधान केलेली ऑरेंज जर्सीमुळे मोठा विवाद निर्माण झाला होता.
आयसीसी (ICC) विश्वकपच्य भारत (India) विरुद्ध बांगलादेश (Bangladesh) एजबास्टन (Edgbaston) येथील सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma)आणि के एल राहुल (KL Rahul) च्या तुफानी खेळीच्या जोरावर टीम इंडिया ची चांगली सुरुवात झाली आहे. याआधीच्या सामन्यात भारताला इंग्लंड (England) कडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात टीम इंडियाने पहिल्यांदा 'अवे जर्सी' म्हणून ऑरेंजे रंगाची जर्सी परिधान केली होती. मात्र, इंग्लंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर चाहत्यांनी या रंगाला जबाबदार मनात त्यावर टीका केली होती. आणि आता बांग्लादेशविरुद्ध महत्वाच्या मॅचमध्ये टीम इंडियाची सुवात चांगली होताच ती जर्सी पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. (IND vs BAN: रोहित शर्मा ने ठोकले World Cup 2019 मधील चौथे शतक, डेविड वॉर्नर ला मागे टाकत गाठला 500 धावांचा टप्पा)
भारतीय टीमने परिधान केलेली ऑरेंज जर्सीमुळे मोठा विवाद निर्माण झाला होता. काही चाहत्यांना याला राजकीय पक्षाचा रंग असे म्हटले होते. आणि आता बांग्लादेशविरुद्ध टीमच्या चांगल्या सुरुवातीनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर अशा प्रकारे प्रतिक्रिया दिल्या आहेत:
एजबस्टन मैदानावर होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवून भारताला सेमीफायनलमध्ये जागा निश्चित करण्याची संधी आहे. भारतानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रोहित आणि राहुल यांनी आक्रमक सुरुवात केली आहे. रोहित सध्या वर्ल्ड कपमध्ये सगळ्यात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता पहिल्या क्रमांकावर आहे. 28व्या ओव्हरमध्ये 117च्या स्ट्राईक रेटनं रोहितने विश्वकपमधील चौथे शतक पूर्ण केले. भारतीय संघाचे 7 सामन्यात 11 गुण झाले आहेत. गुणतक्त्यात टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास भारताचा संघ 13 गुणांसह सेमीफायनलमध्ये पोहोचेल.