कोरोना लॉकडाउन काळात जिवा धोनी बनली डेअरडेव्हिल, जुनिअर धोनीच्या स्टाईलने नेटिझन्स इम्प्रेस (Watch Video)
स्वत: धोनी बाईकवर तिच्या मागे बसला आहे. जिवा या क्षणाचा खूप आनंद घेत असताना दिसली. व्हिडिओमध्ये तिची आई साक्षी विचारते की जिवा तुला बाईक आवडते का, ज्यावर जिवा हो म्हणून उत्तर देते.
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याचं बाईकसाठीची आवड आणि प्रेम जगजाहीर आहे. माहीच्या गॅरेजमध्ये शेकडो महागड्या गाड्यांचा संग्रहच नाही तर त्याने बऱ्याच तेथे जुन्या वाहनांची नव्याने रचनाही केली आहे. धोनी अनेकदा आपल्या वेगवेगळ्या वाहनांसह रांचीच्या रस्त्यावर फिरताना दिसतो. धोनीप्रमाणेच त्याची मुलगी जिवालाही (Ziva) बाईकबद्दल कमी प्रेम आहे आणि तीसुद्धा या प्रकरणात वडिलांवर गेली आहे. सध्या कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात लॉकडाउन (Lockdown) वाढवण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना अधिक काळ आपल्या घरातच कैद राहावे लागणार आहे. धोनीही कुटुंबासोबत रांचीमधील त्याच्या फार्महाऊसवर आहे. धोनी सोशल मीडियावर अधिक सक्रिय नसला तरी त्याची पत्नी साक्षी धोनी (Sakshi Dhoni) सोशल मीडियावर लॉकडाउन दरम्यान त्याचे आणि जिवाचे फोटो व व्हिडिओ शेअर करत आहे. काही दिवसांपूर्वी जिवाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला ज्यात जिवा डेअरडेव्हिल बनून बाईक शिकताना दिसली. (Lockdown: एमएस धोनी रांची फार्म हाऊसमध्ये मुलगी जिवा आणि कुत्र्यासोबत करतोय कॅचिंगचा सराव, पाहा Cute व्हिडिओ)
स्वत: धोनी बाईकवर तिच्या मागे बसला आहे. जिवा या क्षणाचा खूप आनंद घेत असताना दिसली. व्हिडिओमध्ये तिची आई साक्षी विचारते की जिवा तुला बाईक आवडते का, ज्यावर जिवा हो म्हणून उत्तर देते. पाहा व्हिडिओ:
दुसरीकडे, सोशल मीडियावर जिवाचा व्हिडिओ व्हायरल झाला. यूजर्सना जुनिअर धोनीची ही स्टाईल खूप पसंती पडली. पाहा नेटिझन्सच्या प्रतिक्रिया:
बाबांची मुलगी
वडिलांच्या बाईकवर जिवाची राईड
तुझी राईड निवडण्याची प्रतीक्षा
दरम्यान, धोनीने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 2019 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये खेळला. भारताला न्यूझीलंडविरुद्ध त्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आणि तेव्हा पासून धोनीने क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. या दरम्यान फॅन्स 13 व्या आयपीएलची आतुरतेने वाट पाहत होते. धोनी आयपीएलमधून क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता, पण आयपीएल कोरोना व्हायरसमुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याने धोनी आणि चाहत्यांची प्रतीक्षा लांबणीवर गेली आहे.