आयसीसी कडून झिम्बाम्बे क्रिकेटवर निलंबनाची कारवाई, Netizens ने व्यक्त केली निराशा
झिम्बाम्बे क्रिकेटमध्ये सरकारी हस्तक्षेपामुळे हा निर्णय घेण्यात आला. याबाबत झिम्बाम्बे क्रिकेटला आधीच इशारा देण्यात आला होता.
आंतरराष्टीय क्रिकेट परिषद (ICC) ने झिम्बाम्बे (Zimbabwe) क्रिकेटवर निलंबनाची कारवाई केली आहे. लंडन मध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून आयसीसीने याबाबाद गुरुवारी घोषणा केली. शिवाय हा आय़सीसीने हा निर्नत्य सर्वांच्या सहमतीने घेतला असल्याचे देखील म्हटले. झिम्बाम्बे क्रिकेटमध्ये सरकारी हस्तक्षेपामुळे हा निर्णय घेण्यात आला. याबाबत झिम्बाम्बे क्रिकेटला आधीच इशारा देण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही सरकारी हस्तक्षेप कमी करण्यात झिम्बाम्बे क्रिकेट अपयशी ठरल्याने अखेर आयसीसीला निलंबनाची कारवाई करावी लागली.
याआधी झिम्बाम्बे सरकारने तिथल्या क्रिकेट बोर्डाला निलंबित केले होते. आयसीसीकडून हा निर्णय घेतल्यावेळी झिम्बाम्बेची आय़र्लंडविरुद्ध वनडे मालिका सुरू होती. या निलंबनावर बोलताना आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर (Shashank Manohar) म्हणाले की, "झिम्बाम्बेमध्ये जे घडले ते आयसीसीच्या संविधानाचे गंभीर उल्लंघन आहे आणि आम्ही ते असेच सुरु ठेवू शकत नाही. आयसीसीच्या संविधानानुसार झिम्बाम्बेमध्ये क्रिकेट सुरु राहावे अशी इच्छा आहे." आयसीसी कडून या कारवाईवर क्रिकेट विश्वातील अनेक खेळाडूंनी आणि चाहत्यांनी ट्विटरवर निराशा व्यक्त केली आहे.
झिम्बाम्बेशिवाय क्रोएशिया क्रिकेट फेडरेशनवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आता या निलंबनामुळे झिम्बाम्बे क्रिकेट संघटनेला आयसीसीकडून कोणताही निधी मिळणार नाही, शिवाय त्यांना आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.