Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
हेडने अवघ्या 17 चेंडूत अर्धशतक ठोकून इतिहास रचला. तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वात वेगवान अर्धशतक बनला आहे. त्याच्या आधी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसने 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण करण्याचा पराक्रम केला.
AUS vs SCO 1st T20I: ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज ट्रॅव्हिस हेडने बुधवारी (4 सप्टेंबर) स्कॉटलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात खतरनाक कामगिरी केली. त्याने 25 चेंडूत 80 धावांची तुफानी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 12 चौकार आणि 5 षटकार मारले. हेडने अवघ्या 17 चेंडूत अर्धशतक ठोकून इतिहास रचला. तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वात वेगवान अर्धशतक बनला आहे. त्याच्या आधी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसने 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण करण्याचा पराक्रम केला. स्टॉइनिसने ऑक्टोबर 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध अशी कामगिरी केली होती.
ट्रॅव्हिस हेड बनला 'पॉवरप्ले किंग'
टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पॉवरप्लेमध्ये (पहिली सहा षटके) सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम त्याने केला आहे. पॉवरप्लेमध्ये त्याने 73 धावा जोडल्या. हेडने आयर्लंडचा अनुभवी क्रिकेटपटू पॉल स्टर्लिंगचा विक्रम मोडला आहे. स्टर्लिंगने 2020 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या 6 षटकात 67 धावा केल्या. या यादीत त्याच्यानंतर कॉलिन मुनरो (66), क्विंटन डी कॉक (64) आणि एविन लुईस (62) सारखे खेळाडू आहेत.
टी-20 सामन्यात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा
73 - ट्रॅव्हिस हेड विरुद्ध स्कॉटलंड, 2024
67 - पॉल स्टर्लिंग विरुद्ध वेस्ट इंडीज, 2020
66 - कॉलिन मुनरो विरुद्ध वेस्ट इंडिज, 2018
64 - क्विंटन डी कॉक विरुद्ध वेस्ट इंडिज, 2023
62 - एविन लुईस विरुद्ध बांगलादेश 2026
62 - जॉन्सन चार्ल्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2024
60 - मोहम्मद वसीम विरुद्ध अफगाणिस्तान, 2023
स्कॉटलंडच्या एडिनबर्ग मैदानावर 155 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली. टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा जेक फ्रेझर-मॅकगर्क पहिल्याच षटकात खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर हेडने कर्णधार मिचेल मार्शसह आघाडी घेतली आणि स्कॉटलंडच्या गोलंदाजांना धुवुन टाकले. दोघांनी पॉवरप्लेमध्ये 113 धावा केल्या आणि विश्वविक्रम केला. टी-20 इंटरनॅशनलमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा जोडणारा ऑस्ट्रेलिया संघ बनला आहे. मात्र पॉवरप्ले संपताच हेड आणि मार्शने विकेट गमावल्या. मार्क वॉटने दोघांनाही आपल्या जाळ्यात अडकवले.
दोघेही एकाच षटकात बाद झाले
सातव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर वॅटने मार्शला मायकेल लीस्ककडे झेलबाद केले. कर्णधाराने 12 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 39 धावा केल्या. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर वॅटने हेडला लीस्कने झेलबाद केले. हेड आऊट झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 123 होती. जोश इंग्लिस 13 चेंडूत 27 धावा करून नाबाद राहिला आणि स्टोइनिस 5 चेंडूत 8 धावा करून नाबाद राहिला. स्टॉइनिसने विजयी षटकार ठोकला. ऑस्ट्रेलिया सात गडी राखून जिंकला. कांगारूंनी अवघ्या 9.4 षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला. मार्श ब्रिगेड आणि स्कॉटलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना 6 सप्टेंबर रोजी होणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)