TRA vs SUP, Women’s T20 Challenge 2020 Final: सुपरनोव्हासने जिंकला टॉस, पहिले घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय
आजच्या सामन्यात एकीकडे सुपरनोव्हास विजेतेपदाची हॅटट्रिक करण्याच्या प्रयत्नात असेल तर ट्रेलब्लेझर महिला टी-20 चॅलेंजचे पहिले विजेतेपद जिंकण्याच्या निर्धारित असतील.
Women’s T20 Challenge 2020 Final: ट्रेलब्लेझर (Trailblazers) आणि सुपरनोव्हास (Supernovas) यांच्यातील महिला टी-20 चॅलेंजचा फायनल सामना थोड्याच वेळात सुरु होईल. सुपरनोव्हासचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करीत आहेत, तर ट्रेलब्लेझरचे नेतृत्व स्मृती मंधाना करत आहेत. शारजाह (Sharjah) येथील अंतिम सामन्यात सुपरनोव्हास कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात एकीकडे सुपरनोव्हास विजेतेपदाची हॅटट्रिक करण्याच्या प्रयत्नात असेल तर ट्रेलब्लेझर महिला टी-20 चॅलेंजचे पहिले विजेतेपद जिंकण्याच्या निर्धारित असतील. सुपरनोव्हास 2018 आणि 2019 मध्ये स्पर्धेचे चॅम्पियन बनले होते. यापूर्वी, दोन्ही संघात झालेल्या मागील सामन्यात हरमनप्रीतच्या सुपरनोव्हासने अवघ्या 2 धावांनी विजय मिळवला होता. दोन्ही संघांचे सामन्यात विजेतेपद जिंकण्यासाठी दमदार खेळाडूंचा संघ असल्याने शारजाहमधील फायनल सामना नक्कीच रोमांचक ठरेल. (Women's T20 Challenge 2020 Final Live Streaming: ट्रेलब्लेझर सुपरनोव्हास यांच्यातील महिला टी-20 चॅलेंज फायनल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)
चॅम्पियन संघासाठी सलामीवीर चामरी अटापट्टूने आत्तापर्यंत शानदार प्रदर्शन केले. तिने सर्वाधिक 111 धावा केल्या आहेत. ट्रेलब्लेझर्सविरुद्ध साखळी सामन्यात तिने 48 चेंडूत 67 धावा करून स्पर्धेचे पहिले अर्धशतक झळकावले. आजच्या सामन्यासाठी सुपरनोव्हासने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला असून ट्रेलब्लेझरने देखील मागील प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. सुपरनोव्हासने प्रिया पुनियाच्या जागी पूजा वस्त्रकरला संधी दिली असून ट्रेलब्लेझरने दयालन हेमलथाला बाहेर केले असून नुजत परवीनचा समावेश केला आहे. यंदाच्या हंगामात सुपरनोव्हासमी ट्रेलब्लेझर आणि वेलॉसिटी, या तिन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला होता. पण सुपरनोवाज आणि ट्रेलब्लेझर संघ नेट रनरेटच्या जोरावर अंतिम सामन्यात पोहचले आहेत.
आसा आहे आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाचा प्लेइंग इलेव्हन
ट्रेलब्लेझर: स्मृति मंधाना (कॅप्टन), डिएंड्रा डॉटिन, दीप्ति शर्मा, रिचा घोष, नुजत परवीन (विकेटकीपर), हर्लीन देओल, नट्टकन चंटम, सलमा खातुन, राजेश्वरी गायकवाड, सोफी एक्लस्टोन आणि झूलन गोस्वामी.
सुपरनोव्हास: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), जेमीमाह रॉड्रिग्ज, चमारी अटापट्टू, अनुजा पाटील, राधा यादव, तानिया भाटिया (विकेटकीपर), शशिकला सिरीवर्डेन, पूनम यादव, शकेरा सेलमन, पूजा वस्त्रकर आणि आयबोंगा खाका.