IPL 2020 Top-Scores So Far: KXIP कर्णधार केएल राहुल, MIचा रोहित शर्मा ते संजू सॅमसन; UAEमध्ये आजवर भारतीय फलंदाजांचे वर्चस्व, पाहा आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या आवृत्तीत भारतीय स्टार खेळाडूंनी युएईच्या खेळपट्टीवर अविश्वसनीय फलंदाज करून सर्वांचे मन जिंकले. 2020व्या सत्रातील पहिल्या आठवड्यात रोहित शर्मा, केएल राहुल, अंबाती रायडू, शुभमन गिल, संजू सॅमसन आणि मयंक अग्रवालसह भारतीय फलंदाजांनी स्पर्धेत वर्चस्व गाजवले आहे.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (केकेआर) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) फलंदाजीचा मास्टर-स्ट्रोक, ते विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध केएल राहुलच्या (KL Rahul) विक्रमी शतक, युएईमध्ये (UAE) सुरु असलेले इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League) 13वे सत्र सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करत आहे हे नाकारता येणार नाही. लीगच्या 13व्या आवृत्तीत भारतीय स्टार खेळाडूंनी युएईच्या खेळपट्टीवर अविश्वसनीय फलंदाज करून सर्वांचे मन जिंकले. 2020व्या सत्रातील पहिल्या आठवड्यात रोहित, राहुल, अंबाती रायडू, शुभमन गिल (Shubman Gill), संजू सॅमसन (Sanju Samson) आणि मयंक अग्रवालसह भारतीय फलंदाजांनी स्पर्धेत वर्चस्व गाजवले आहे. विशेष म्हणजे आयपीएलच्या (IPL) चालू हंगामात आजवर तब्बल सात फलंदाज 70 धावांचा टप्पा पार करू शकले आहेत. (KXIP vs RCB आयपीएल सामन्यात केएल राहुलच्या शतकी डावामागे रोहित शर्माची भूमिका, पंजाब कर्णधाराने ट्विट करून केले उघड See Tweet)
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध फाफ डु प्लेसिसच्या 72 धावा व्यतिरिक्त उर्वरित सहा वैयक्तिक सर्वोच्च स्कोअरची नोंद भारतीय फलंदाजांनी केली आहे. पहिल्या आठवड्यातील खेळीनंतर पहिल्या चार स्थानांवर भारतीय फलंदाजांनी कब्जा केला आहे. आयपीएल 2020 मधील सर्वोच्च वैयक्तिक स्कोअरच्या यादीवर एक नजर टाकूया.
केएल राहुल- नाबाद 132 विरुद्ध आरसीबी
किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलने विराट कोहलीच्या आरसीबीविरुद्ध शतकी डावाच्या जोरावर इतिहासाच्या पुस्तकात आपले नाव दाखल केले. राहुलने आरसीबी गोलंदाजांची क्लास घेतली आणि आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 2,000 धावा करण्याच्या सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. शिवाय, त्याच्या मॅच-विनिंग 132 धावा आयपीएलच्या इतिहासातील भारतीयांकडून सर्वाधिक आणि आयपीएलच्या कर्णधाराची सर्वोच्च धावसंख्या देखील आहे.
मयंक अग्रवाल-89 विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
मयंक अग्रवालने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील दिल्लीविरुद्ध सलामीच्या सामन्यात शानदार लढा दिला. अग्रवालने पंजाबकडून सर्वाधिक धावा केल्या. अग्रवालने 60 चेंडूत 89 धावा केल्या जो त्याच्या आयपीएलमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
रोहित शर्मा-80 वि केकेआर
रोहित शर्माने कोलकाता नाईट रायडर्सच्या (केकेआर) गोलंदाजीची धुलाई केलीपॅट कमिन्स, कुलदीप यादव आणि शिवम मावी यांसारख्या गोलंदाजांचा समावेश आहे. मुंबई इंडियन्सच्या हंगामातील पहिल्या विजयासाठी मार्गदर्शन करीत रोहितही आयपीएलमध्ये एमएस धोनीनंतर 200 षटकार मारणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. रोहितने 54 चेंडूत 80 धावांचा डाव खेळला.
संजू सॅमसन - 74 विरुद्ध सीएसके
स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्सच्या माजी चॅम्पियन सीएसकेवर आश्चर्यकारक विजयात संजू सॅमसनने तुफान फटकेबाजी केली. राजस्थान रॉयल्सने 20 ओव्हरमध्ये 7 बाद 216 धावांचे सीएसकेला आव्हान दिले ज्यात सॅमसनने अवघ्या 32 चेंडूत 74 धावांची शानदार खेळी केली.
अंबाती रायुडू-71 विरुद्ध मुंबई इंडियन्स
13 व्या सत्रात फटाके फटकेबाजी करीत अनुभवी फलंदाज अंबाती रायुडूने सामन्याच्या पहिल्या दिवशी पराक्रम व धैर्याने कामगिरी बजावली. रायुडूच्या अर्धशतकी डावाच्या जोरावर सीएसकेने मुंबई इंडियन्सविरुद्ध सहज विजय मिळवला. रायुडूने 48 चेंडूत71 धावांचा डाव खेळला.
शुभमन गिल-70 विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
कोलकाता नाइट रायडर्सच्या मुंबई इंडियन्सविरुद्ध सलामीच्या सामन्यात खराब फलंदाजीत अपयशी ठरलेल्या आयपीएलच्या 13 व्या आवृत्तीतील सर्वात रोमांचक डावात युवा फलंदाज शुभमन गिलने 62 चेंडूत नाबाद 70 धावा फटकावल्या. शुभमनने अर्धशतकी डाव खेळत केकेआरला विजय मिळवून दिला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)