Teams With Most Wins in Test Cricket: कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप 5 संघ, टीम इंडिया आहे 'या' स्थानावर
बांगलादेशविरुद्धची मालिका जिंकून भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करायचे आहे
मुंबई: भारत आणि बांगलादेश यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका (IND vs BAN Test Series 2024) खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी 19 सप्टेंबरपासून चेन्नईत खेळवली जाणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप पॉइंट टेबलच्या दृष्टीने भारत-बांगलादेश मालिका खूप महत्त्वाची आहे. बांगलादेशविरुद्धची मालिका जिंकून भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करायचे आहे. पण त्याआधी तुम्हाला माहित आहे का कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिकणार कोणता संघ आहे? आज आम्ही तुम्हाला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या टॉप-5 संघांची यादी सागणार आहोत, जाणून घ्या पहिल्या स्थानावर कोणत्या संघाचे आहे वर्चस्व.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप 5 संघ (Top 5 Teams with Most Match Wins in Test Cricket)
1. ऑस्ट्रेलिया (Australia)
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिकणारा ऑस्ट्रेलियाचा संघ यादीत अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन संघाने 866 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात संघाने 414 सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 47.80 आहे.
2. इंग्लंड (England)
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंड संघाने 1077 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात संघाने 397 सामने जिंकले आहेत. इंग्लंडची विजयाची टक्केवारी 36.86 आहे.
हे देखील वाचा: Team India Practice: बांगलादेश मालिकेच्या तयारीत टीम इंडिया व्यस्त, चेन्नईमध्ये खेळाडूंनी गाळला घाम; बीसीसीआयने शेअर केले फोटो
3. वेस्ट इंडिज (West Indies)
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या या यादीत वेस्ट इंडिजचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिज संघाने आतापर्यंत 580 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये संघाने 183 कसोटी सामने जिंकले आहेत. वेस्ट इंडिजची विजयाची टक्केवारी 31.55 आहे.
4. दक्षिण आफ्रिका (South Africa)
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आतापर्यंत 466 कसोटी सामने खेळले असून त्यात त्यांनी 179 कसोटी सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी 38.41 आहे.
5. भारत (India)
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या देशांच्या यादीत टीम इंडिया पाचव्या स्थानावर आहे. टीम इंडियाने आतापर्यंत 579 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने 178 कसोटी सामने जिंकले आहेत. टीम इंडियाची विजयाची टक्केवारी 30.74 आहे.