IND vs ENG Test Series 2025: भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत सर्वाधिक धावा करणारे टॉप-5 फलंदाज, अव्वल स्थानी कोण?
अनेकदा विक्रमांच्या बाबतीत जरी सचिन तेंडुलकर अव्वल स्थानावर दिसला असला तरी, भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंची यादी पाहिली तर भारतीय दिग्गज येथे अव्वल स्थानावर नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 फलंदाजांमध्ये...
IND vs ENG Test Series 2025: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका 20 जूनपासून (IND vs ENG Test Series 2025) सुरू होणार आहे. 4 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या मालिकेत एकूण पाच सामने खेळले जाणार आहेत. यासाठी भारतीय संघ इंग्लंमध्ये पोहचला आहे. दरम्यान, अनेकदा विक्रमांच्या बाबतीत जरी सचिन तेंडुलकर अव्वल स्थानावर दिसला असला तरी, भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंची यादी पाहिली तर भारतीय दिग्गज येथे अव्वल स्थानावर नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 फलंदाजांमध्ये...
1. जो रूट (Joe Root)
इंग्लंडच्या या दिग्गज फलंदाजाने 2012 ते 2024 पर्यंत भारताविरुद्ध एकूण 30 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 55 डावांमध्ये 58.08 च्या सरासरीने 2846 धावा केल्या आहेत. यादरम्यान, रूटच्या बॅटमधून 10 शतके आणि 11 अर्धशतके झळकली आहेत.
2. सचिन तेंडुलकर
1990 ते 2012 पर्यंत, भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने इंग्लंडविरुद्ध 32 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 51.73 च्या सरासरीने एकूण 2535 धावा केल्या. या काळात, 'मास्टर-ब्लास्टर'ने सात शतके आणि 13 अर्धशतके केली.
3. सुनील गावस्कर
या यादीत, 'मास्टर-ब्लास्टर' दुसऱ्या स्थानावर आहे, तर 'लिटिल मास्टर' तिसऱ्या स्थानावर आहे. दिग्गज सुनील गावस्कर यांनी 1971 ते 1986 दरम्यान इंग्लंडविरुद्ध 38 कसोटी सामने खेळले. या काळात, गावस्कर यांनी 38.20 च्या सरासरीने 2483 धावा केल्या, ज्यामध्ये चार शतके आणि 16 अर्धशतके होती.
4. अॅलिस्टर कुक
इंग्लंडचा माजी कर्णधार 2006 ते 2018 पर्यंत भारताविरुद्ध 30 कसोटी सामने खेळला, त्यादरम्यान कुकने 54 डावांमध्ये 47.66 च्या सरासरीने 2431 धावा केल्या. कुकने भारताविरुद्धच्या कसोटी कारकिर्दीत सात शतके आणि नऊ अर्धशतके केली आहेत.
5. विराट कोहली
कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या कोहलीने 2012 ते 2022 दरम्यान इंग्लंडविरुद्ध 28 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान कोहलीने 42.36 च्या सरासरीने 1991 धावा केल्या आहेत. कोहलीने इंग्लंडविरुद्ध पाच शतके आणि नऊ अर्धशतके केली आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)