IPL 2022 मेगा लिलावात 3 फ्रँचायझी David Warner वर लावू शकतात दाव, ‘हा’ संघ मारू शकतो एका दगडात दोन पक्षी
अशा स्थितीत SRH सलामीवीरासाठी पुढील लिलावात कोणते संघ बोली लगावू शकतात हे पाहूया.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या 14 व्या हंगामाच्या 40 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध जेव्हा सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) डेविड वॉर्नरला (David Warner) प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले नाही, तेव्हा हे स्पष्ट झाले की हा ऑस्ट्रेलियन खेळाडू पुढील वर्षी स्पर्धेपूर्वी होणाऱ्या मेगा लिलावात उतरणार आहे. SRH चा माजी कर्णधार आणि रन मशीन वॉर्नरचा संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये 14 व्या हंगामाच्या हैदराबादसोबत आयपीएल (IPL) प्रवास संपुष्टात येणार असल्याचे कयास लगावले जात आहेत. आयपीएलच्या इतिहासात पाचवा सर्वाधिक धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन सलामीवीर वॉर्नरला SRH ने 2014 च्या लिलावात 5.5 कोटी रुपयांमध्ये करारबद्ध केले होते. व्हाईट बॉल क्रिकेटमधील सर्वात विनाशकारी सलामीवीरांपैकी एक म्हणून ओळखले जाणाऱ्या वॉर्नरला आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात निवडकर्त्याच्या विश्वासाची परतफेड करण्यात ऑस्ट्रेलियन अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्यांदा वगळण्यात आले. (IPL 2021: तळाशी बसलेल्या SRH चा खेळ अद्याप बाकी, 9 पैकी 8 सामने गमावल्यानंतरही आहे प्लेऑफच्या शर्यतीत, जाणून घ्या समीकरण)
वॉर्नरने देखील तो स्टेडियमवर पुन्हा 'एका चाहत्याला' दिसणार नाही अशी पुष्टी केल्यावर त्याचे SRH कारकीर्द संपुष्टात आलेले दिसत आहेत. अशा स्थितीत SRH सलामीवीरासाठी पुढील लिलावात कोणते संघ बोली लगावू शकतात हे पाहूया.
1) कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders)
आयपीएल 2021 च्या लिलावापूर्वी हैदराबादने सलामी फलंदाजाला रिलीज केल्यास नाईट रायडर्स वॉर्नरला ताब्यात घेण्यासाठी पहिले पाऊल टाकू शकतात. शुभमन गिलचा आदर्श सलामीचा भागीदार बनून व्यंकटेश अय्यरने अव्वल क्रमवारीत आपले स्थान पक्के केले असले तरी, इयन मॉर्गनचा केकेआर माजी हैदराबाद कर्णधारासाठी बोली लावण्याच्या मेगा लिलावात दावेदार बनू शकतो.
2) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore)
वॉर्नर आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात उतरला तर अनेक मोठे संघ त्याच्यावर बोली लावण्यास तयार होतील. या यादीतील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर देखील सामील आहे. वॉर्नरला खरेदी करून आरसीबी एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न करू शकतो. विराट कोहली फ्रँचायझी कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या तयारीत असल्याने, बेंगलोर आयपीएल लिलावात वॉर्नरला साईन करण्याची अधिक कारणे आहेत. कोहली या हंगामात आरसीबीचा तात्पुरता सलामीवीर आहे. पुढील हंगामात कर्णधारपद सोडल्यानंतर RCB कर्णधार त्याच्या सर्वाधिक पसंतीच्या क्रमांक 3 वर परत येऊ शकतो. जर RCB ने मेगा लिलावात वॉर्नरला खरेदी केले तर त्यांना केवळ स्फोटक टॉप-ऑर्डर फलंदाजच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर दीर्घकाळ कर्णधारपद भूषवलेला खेळाडूही मिळेल.
3) चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings)
पुढील वर्षी होणाऱ्या लिलावात वॉर्नरला कायम ठेवण्यासाठी सनरायझर्स राइट्स टू मॅच (आरटीएम) पर्याय वापरण्याची शक्यता नाही आहे. अनुभवी सलामीवीर फाफ डू प्लेसिस त्याच्या आयपीएल कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असताना, सीएसके वॉर्नरसाठी बोली लावू शकतात.