'डकवर्थ लुईस' पद्धतीचा शोध लावणारे प्रसिध्द टोनी लुईस यांचे निधन, इंग्लंड क्रिकेट बोर्डने दिली माहिती
क्रिकेटला प्रसिद्ध डकवर्थ-लुईस नियम देणाऱ्या जोडीचे ते सदस्य होते. त्याच्या नावावर क्रिकेटच्या नियमाचे नाव डकवर्थ-लुईस-स्टर्न असे ठेवण्यात आले. लुईसना क्रिकेट आणि गणिताच्या योगदानाबद्दल 2010 मध्ये एमबीई अर्थात ब्रिटीश साम्राज्याचा प्रतिष्ठित सन्मान मिळाला होता.
गणितज्ञ टोनी लुईस (Tony Lewis) यांचे निधन झाले आहे. क्रिकेटला प्रसिद्ध डकवर्थ-लुईस नियम (Duckworth–Lewis method) देणाऱ्या जोडीचे ते सदस्य होते. त्याच्या नावावर क्रिकेटच्या नियमाचे नाव डकवर्थ-लुईस-स्टर्न असे ठेवण्यात आले. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (England And Wales Cricket Board) बुधवारी जाहीर केले की, "हवामानामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये वापरल्या जाणार्या डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीतील लुईस यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले आहे. इंग्लंड बोर्डाने निवेदनात असे म्हटले आहे की, “ईसीबीला ECB) 78 वर्षीय टोनी लुईस एमबीई (MBI) यांचा मृत्यू झाल्याची फार खेद जनक बातमी कळली.” टोनी यांनी सहकारी गणितज्ञ फ्रँक डकवर्थ यांच्यासमवेत डकवर्थ-लुईस नियमाचा शोध लावला जो 1997 मध्ये आयसीसीसमोर (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) सादर केली आणि 1999 मध्ये अधिकृतपणे स्वीकारण्यात आली. 2014 मध्ये डकवर्थ-लुईस-स्टर्न मेथड म्हणून या नियमाचे नाव बदलण्यात आले. या नियमानुसार, पाऊस होणाऱ्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जगभरात आजही या नियमाचा वापर केला जातो.
दरम्यान, या नियमाला बर्याचदा टीकेला सामोरे जावे लागले आहे. वर्ष 2014 मध्ये ऑस्ट्रेलियन आकडेवारीतज्ञ स्टीव्हन स्टर्न यांनी सध्याच्या स्कोअरिंग-रेटसह या नियमात सुधारणा केली. ईसीबीने म्हटले की, "2014 मध्ये नाव बदलल्यानंतरही, गणिताचे हे सूत्र जगभरात पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यांमध्ये वापरले गेले आहे. आम्ही टोनीच्या कुटूंबियांबद्दल मनापासून शोक व्यक्त करतो. त्यांच्या योगदानाबद्दल, क्रिकेट हे टोनी आणि फ्रँक दोघांचे ऋणी असेल." सिडनी येथे झालेल्या 1992 मध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 'प्रसिद्ध' सेमीफायनलनंतर हा नियम लागू करण्यात आला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 13 चेंडूत 22 धावांची गरज होती. थोडा वेळ पाऊस पडल्यावर विजयाचे लक्ष्य 13 चेंडूंत 21 धावांवर कमी झाल्याने आफ्रिकन संघ आश्चर्यचकित झाला.
लुईस, हे क्रिकेटपटू नव्हते मटार त्यांना क्रिकेट आणि गणिताच्या योगदानाबद्दल 2010 मध्ये एमबीई अर्थात ब्रिटीश साम्राज्याचा प्रतिष्ठित सन्मान मिळाला होता.