SL vs BNG, Asia Cup 2022 Live Streaming: श्रीलंका आणि बांगलादेश संघासाठी आजचा सामना करो या मरो; सामना कधी आणि कुठं पाहणार?

श्रीलंका आणि बांगलादेश (SL vs BNG) संघांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि अव्वल स्थानावर येण्याच्या आशा कायम ठेवण्यासाठी आजचा सामना करो या मरोपेक्षा कमी नाही.

SL vs BNG (Photo Credit - Twitter)

आशिया कप 2022 (Asia Cup 2022) च्या ब गटातील पाचवा सामना श्रीलंका आणि बांगलादेश (SL vs BNG) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांनी आशिया चषकातील आपला पहिला सामना बलाढ्य अफगाणिस्तानविरुद्ध (AFG) गमावला असून, सलग दोन सामने जिंकून अफगाणिस्तानने सुपर 4 मध्ये स्थान पक्के केले आहे. श्रीलंका आणि बांगलादेश (SL vs BNG) संघांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि अव्वल स्थानावर येण्याच्या आशा कायम ठेवण्यासाठी आजचा सामना करो या मरोपेक्षा कमी नाही. आज जो संघ हरेल, त्याचा प्रवास इथेच थांबेल. जो तेथे जिंकेल तो स्पर्धेच्या पुढील फेरीत म्हणजेच सुपर फोरमध्ये पोहोचेल आणि तिथे पोहोचणारा तिसरा संघ देखील बनेल. पण, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सुपर फोरमध्ये कोणता संघ जाणार, हे सामन्यानंतर निश्चित होणार आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांवर स्पर्धेचे दडपण असणार हे स्पष्ट आहे.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आशिया कप 2022 सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आशिया कप 2022 सामना गुरुवार, 1 सप्टेंबर 2022 म्हणजे आज होणार आहे. तसेच, हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे खेळला जाईल.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आशिया कप 2022 सामना कधी सुरू होईल?

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आशिया कप 2022 सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.

कोणते टीव्ही चॅनेल श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आशिया कप 2022 सामना प्रसारित करतील?

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आशिया कप 2022 सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट एचडी चॅनेलवर प्रसारित केला जाईल. (हे देखील वाचा: IND vs HK, Asia Cup 2022: हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव करून भारताने सुपर-4 मध्ये केला प्रवेश)

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आशिया चषक 2022 सामन्याचे Live Streaming कसे पहावे?

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आशिया चषक 2022 सामन्याचे Live Streaming हॉटस्टारवर उपलब्ध असेल.



संबंधित बातम्या

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

ZIM vs AFG 1st ODI 2024 Live Streaming: टी-20 नंतर झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे मालिकेत येणार आमनेसामने, आज खेळवण्यात येणार पहिला सामना; तुम्ही 'येथे' पाहून घ्या सामन्याचा आनंद

NZ Beat ENG 3rd Test 2024 Scorecard: तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने इंग्लंडचा 423 धावांनी केला पराभव, मिशेल सँटनर ठरला विजयाचा हिरो; टीम साऊदीला मिळाल शानदार निरोप