PBKS vs DC IPL 2025 58th Match Winner Prediction: आज पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये होणार जोरदार लढत, सामना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो

पंजाब किंग्जचा संघ उत्तम फॉर्ममध्ये आहे आणि 11 सामन्यांत सात विजयांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दिल्ली कॅपिटल्ससाठी आजचा सामना 'करो या मरो' असा आहे. जर दिल्लीचा आज पराभव झाला तर त्यांचे प्लेऑफमध्ये खेळण्याचे स्वप्न जवळजवळ संपुष्टात येईल.

PBKS vs DC IPL 2025 58th Match Winner Prediction: आज पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये होणार जोरदार लढत, सामना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
PBKS vs DC (Photo Credit- X)

Punjab Kings vs Delhi Capitals, TATA IPL 2025 58th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 58 वा सामना आज म्हणजेच 08 मे रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता धर्मशाळेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवण्यात येईल. या हंगामात, दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, पंजाब किंग्जची कमान श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आहे. पंजाब किंग्जचा संघ उत्तम फॉर्ममध्ये आहे आणि 11 सामन्यांत सात विजयांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दिल्ली कॅपिटल्ससाठी आजचा सामना 'करो या मरो' असा आहे. जर दिल्लीचा आज पराभव झाला तर त्यांचे प्लेऑफमध्ये खेळण्याचे स्वप्न जवळजवळ संपुष्टात येईल.

हेड टू हेड रेकाॅर्ड (PBKS vs DC Head to Head)

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एकूण 33 सामने खेळले गेले आहेत. आतापर्यंत दोन्ही संघांमधील सामने समान लढतीचे झाले आहेत. पंजाब किंग्जच्या संघाने 17 सामने जिंकले आहेत. तर, दिल्ली कॅपिटल्सने फक्त 16 सामने जिंकले आहेत. या हंगामात दोन्ही संघांमधील ही पहिलीच भेट आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळवण्यात आला होता. या दरम्यान पंजाब किंग्जने विजय मिळवला होता. दिल्ली कॅपिटल्सला हा सामना जिंकून त्यांची आकडेवारी सुधारायची आहे.

हे देखील वाचा: PBKS vs DC IPL 2025 58th Match Key Players: पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणार रोमांचक सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर

हा संघ जिंकू शकतो (PBKS vs DC Match Winner Prediction)

या सामन्यात पंजाब किंग्जचा संघ वरचढ असल्याचे दिसून येत आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्ससाठी आव्हानात्मक असू शकतो, विशेषतः पंजाब किंग्जच्या मजबूत गोलंदाजी आणि फलंदाजीविरुद्ध. पंजाब किंग्जच्या अलीकडील कामगिरीकडे पाहता, ते स्पर्धेतील 58 वा टी-20 सामना जिंकू शकतात. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळतो.

पंजाब किंग्ज जिंकण्याची शक्यता: 60%

दिल्ली कॅपिटल्सची जिंकण्याची शक्यता: 40%.

दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर

पंजाब किंग्स: प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्को जॉन्सन, अजमतुल्ला उमरझाई, सूर्यांश शेडगे, हरप्रीत ब्रार, युझवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग.

दिल्ली कॅपिटल्स: फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), करुण नायर, केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, दुष्मंथा चमीरा आणि मुकेश कुमार.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).