PBKS vs DC IPL 2025 58th Match Key Players: पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणार रोमांचक सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
पंजाब किंग्जचा संघ उत्तम फॉर्ममध्ये आहे आणि 11 सामन्यांत सात विजयांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दिल्ली कॅपिटल्ससाठी आजचा सामना 'करो या मरो' असा आहे. जर दिल्लीचा आज पराभव झाला तर त्यांचे प्लेऑफमध्ये खेळण्याचे स्वप्न जवळजवळ संपुष्टात येईल.
Punjab Kings vs Delhi Capitals, TATA IPL 2025 58th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 58 वा सामना आज म्हणजेच 08 मे रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता धर्मशाळेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवण्यात येईल. या हंगामात, दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, पंजाब किंग्जची कमान श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आहे. पंजाब किंग्जचा संघ उत्तम फॉर्ममध्ये आहे आणि 11 सामन्यांत सात विजयांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दिल्ली कॅपिटल्ससाठी आजचा सामना 'करो या मरो' असा आहे. जर दिल्लीचा आज पराभव झाला तर त्यांचे प्लेऑफमध्ये खेळण्याचे स्वप्न जवळजवळ संपुष्टात येईल.
हेड टू हेड रेकाॅर्ड (PBKS vs DC Head to Head)
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एकूण 33 सामने खेळले गेले आहेत. आतापर्यंत दोन्ही संघांमधील सामने समान लढतीचे झाले आहेत. पंजाब किंग्जच्या संघाने 17 सामने जिंकले आहेत. तर, दिल्ली कॅपिटल्सने फक्त 16 सामने जिंकले आहेत. या हंगामात दोन्ही संघांमधील ही पहिलीच भेट आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळवण्यात आला होता. या दरम्यान पंजाब किंग्जने विजय मिळवला होता. दिल्ली कॅपिटल्सला हा सामना जिंकून त्यांची आकडेवारी सुधारायची आहे.
सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळांडूवर
श्रेयस अय्यर: पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर या हंगामात उत्तम फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध 97* धावांची शानदार खेळी खेळली आणि संघाला दमदार विजय मिळवून दिला. श्रेयस त्याच्या क्लासिकल फटक्यांसाठी आणि अचूक फलंदाजीसाठी ओळखला जातो. लखनौच्या संथ खेळपट्टीवर त्याची भूमिका आणखी महत्त्वाची बनते, कारण तो एक संयमी फलंदाज आहे आणि त्याच्यात डाव हाताळण्याची क्षमता आहे.
शशांक सिंग: पंजाब किंग्जचा फलंदाज शशांक सिंग त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे आणि गेल्या काही सामन्यांमध्ये त्याने चांगला फॉर्मही दाखवला आहे. तो पंजाबसाठी उपयुक्त फिनिशर ठरू शकतो आणि जर संघाला शेवटच्या षटकांमध्ये जलद धावा करायच्या असतील तर शशांक सिंग त्याची भूमिका चांगल्या प्रकारे बजावू शकतो.
अर्शदीप सिंग: पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा डेथ ओव्हर्समध्ये अचूक यॉर्कर गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. या हंगामातही तो उत्तम फॉर्ममध्ये आहे आणि विरोधी फलंदाजांसाठी तो अडचणी निर्माण करू शकतो. जर लखनौच्या खेळपट्टीवर दव पडला नाही तर अर्शदीपची स्विंग गोलंदाजी आणखी घातक ठरू शकते.
केएल राहुल: दिल्ली कॅपिटल्सचा घातक फलंदाज केएल राहुलने गेल्या १० डावांमध्ये ३२२ धावा केल्या आहेत. यादरम्यान, केएल राहुलने 145.59 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. केएल राहुलचे शानदार टायमिंग आणि क्लासिक शॉट्स सामना दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने वळवू शकतात.
ट्रिस्टन स्टब्स: दिल्ली कॅपिटल्सचा आक्रमक फलंदाज ट्रिस्टन स्टब्सने 345 धावा केल्या आहेत आणि त्याचा 194.91 चा स्ट्राईक रेट कोणत्याही गोलंदाजासाठी धोक्याचा इशारा आहे. एकदा ट्रिस्टन स्टब्स लयीत आला की तो षटकारांचा वर्षाव करू शकतो.
कुलदीप यादव: दिल्ली कॅपिटल्सचा स्टार गोलंदाज कुलदीप यादवने गेल्या 9 सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. कुलदीप यादवची अचूक आणि फिरकी गोलंदाजी फलंदाजांना त्रास देऊ शकते.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
पंजाब किंग्स: प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्को जॉन्सन, अजमतुल्ला उमरझाई, सूर्यांश शेडगे, हरप्रीत ब्रार, युझवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग.
दिल्ली कॅपिटल्स: फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), करुण नायर, केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, दुष्मंथा चमीरा आणि मुकेश कुमार.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

