TNPL 2019: टीएनपीएलमध्ये R Ashwin ची 'मिस्ट्री बॉलिंग' बघत सगळेच चक्रावले, पहा (Video)
मदुरै पँथर्स आणि डिंडीगुल ड्रँगस संघातील सामन्यादरम्यान रविचंद्रन अश्विनची 'मिस्ट्री बॉलिंग' बघत फलंदाज पूर्णपणे चक्रावला आणि मोठा शॉट मारण्याच्या नादात आपली विकेट गमावून बसला.
भारतीय संघाचा फिरकीचा जादूगार रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगसाठी चर्चेत आला आहे. टीम इंडियाच्या (Indian Team) आगामी वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यासाठी अश्विनची निवड करण्यात आली आहे. अश्विन विंडीज विरुद्ध 2 टेस्ट सामने खेळण्यासाठी संघाच्या साथ असेल. पण त्याआधी स्वतःला तयार करण्यासाठी अश्विन तमिळनाडुच्या (Tamil Nadu) क्रिकेटपटूंसाठी खास आयोजित केलेल्या तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये (टीएनपीएल) खेळत आहे. या लीगच्या अशाच एका सामन्यादरम्यान अश्विनची बॉलिंग ऍक्शन पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. (Throwback: ...जेव्हा एमएस धोनी च्या उदार व्यक्तिमत्वावर फिदा झाली पाकिस्तानी अभिनेत्री Mathira Khan, जाणून घ्या काय आहे किस्सा)
मदुरै पँथर्स (Madurai Panthers) आणि डिंडीगुल ड्रँगस (Dindigul Dragons) या दोन संघातील सामन्यादरम्यान अश्विनची 'मिस्ट्री बॉलिंग' बघत फलंदाज पूर्णपणे चक्रावला आणि मोठा शॉट मारण्याच्या नादात आपली विकेट गमावून बसला. अश्विनची ही विचित्र गोलंदाजी सोशल मीडियावर सध्या वायरल होत आहे. अश्विनने हा मिस्ट्री बॉल' फेकताना शेवटपर्यंत चेंडू मागे लपवला आणि डाव्या हाताने कोणत्याही प्रकारची हालचाल केली नाही आणि हवेत फुगा सोडतात असा चेंटू टाकला. समोरच्या फलंदाजाने उंच फटकाही लगावला पण चेंडू जास्त लांब जाऊ शकला आणि तो झेलबाद झाला.
अश्विन हा डिंडीगुल ड्रँगसचा कर्णधार आहे. या सामन्यात अश्विनने 4 ओव्हरमध्ये 16 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. याआधी डिंडीगुल संघाने 6 गडी गमावत 182 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करत मदुरै पँथर्स संघ 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावत 152 धावाच करू शकला. दरम्यान, डिंडीगुल ड्रेगन्सच्या पहिल्या सामन्यात देखील अश्विनने कोणीही बघितली नाही अशी गोलंदाजी केली होती. पण त्या सामन्यात त्याला कोणताही विकेट मिळाली नव्हती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)