Tim Paine याची मोठी घोषणा, क्रिकेटमधून घेतला अनिश्चित काळासाठी ब्रेक; Pat Cummins याची ऑस्ट्रेलिया कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती
म्हणजेच अॅशेस मालिकेच्या सुरुवातीला तो दिसणार नाही. यापूर्वी ‘सेक्सिंग’ विवादावरून पेनने कांगारू कसोटी संघाच्या नेतृत्वाचा राजीनामा दिला होता. या दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नुकतंच वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सची नवीन कर्णधार म्हणून अधिकृत घोषणा केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी कसोटी कर्णधार टिम पेनने (Tim Paine) मानसिक आरोग्यामुळे क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे. म्हणजेच अॅशेस मालिकेच्या (Ashes Series) सुरुवातीला तो दिसणार नाही. यापूर्वी ‘सेक्सिंग’ विवादावरून (Sexting Scandal) पेनने कांगारू कसोटी संघाच्या नेतृत्वाचा राजीनामा दिला होता. क्रिकेट तस्मानियाने काही वेळेपूर्वी निवेदन जाहीर केले. 8 डिसेंबरपासून अॅशेस मालिका सुरू होणार असल्याने, ऑस्ट्रेलियाला पेनच्या जागी नवीन यष्टिरक्षकाची गरज भासणार आहे, अॅलेक्स कॅरी आणि जोश इंग्लिस हे पदार्पण करण्यासाठी प्रमुख दावेदार आहेत. पेनवर एका महिलेला अश्लील फोटो आणि संदेश पाठवल्याचा आरोप होता, ज्याची त्याने कबुली दिली आणि काही दिवसांपूर्वीच कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. क्रिकेट तस्मानियानेही (Cricket Tasmania) एक निवेदन जारी केले आहे आणि म्हटले आहे की, “गेल्या 24 तासांच्या चर्चेनंतर, पेनने क्रिकेट तस्मानियाला सांगितले की तो सर्व फॉरमॅट क्रिकेटमधून ब्रेक घेत आहे. क्रिकेट तस्मानिया टीम पेन आणि त्याच्या कुटुंबाला व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या पाठिंबा देत राहील.”
या दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) नुकतंच वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सची (Pat Cummins) नवीन कर्णधार म्हणून अधिकृत घोषणा केली आहे. शिवाय माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उल्लेखनीय आहे की 1956 मध्ये रे लिंडवॉलने एका सामन्यात नेतृत्व केल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पुरुष कसोटी संघाचे नेतृत्व करणारा कमिन्स हा पहिला विशेषज्ञ वेगवान गोलंदाज आहे. मध्यम-गती अष्टपैलू खेळाडू मॉन्टी नोबल आणि जॅक रायडर यांनी 1900 च्या दशकाच्या सुरुवातीला संघाचे नेतृत्व केले. कमिन्स अॅशेस मालिकेपासून संघाची धुरा हाती घेईल. कमिन्स यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “अॅशेसचा मोठा समारंभ होण्याआधी ही भूमिका स्वीकारल्याचा मला सन्मान वाटत आहे.”
“मला आशा आहे की टिम (पेन) ने गेल्या काही वर्षात जे नेतृत्व केले आहे तेच मी संघाला देऊ शकेन. स्टीव्ह आणि मी कर्णधार या नात्याने, या संघात अनेक वरिष्ठ खेळाडू आहेत व काही महान युवा प्रतिभांमुळे आम्ही एक मजबूत आहोत. हा एक अनपेक्षित विशेषाधिकार आहे ज्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे आणि खूप उत्सुक आहे.” चार वर्षांपूर्वी क्रिकेट टास्मानिया (CT) कर्मचार्याला लैंगिक स्पष्ट संदेश पाठवल्याबद्दल त्याची चौकशी करण्यात आली होती, या खुलाशांमुळे पेनच्या कसोटी संघातील स्थानाबाबत अटकळ सुरू झाल्या होत्या.