Asia Cup 2022 साठी तिकीट विक्री 15 ऑगस्टपासून सुरू, IND vs PAK सामन्याच्या तिकिटांना जास्त मागणी

27 ऑगस्टपासून दुबईत सुरू होणाऱ्या या स्पर्धेत 28 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rohit Sharma And Babr Azam (Photo Credit - Twitter)

केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) यावेळी झिम्बाब्वे (Zimbabwe) दौऱ्यावर गेली असली तरी सर्वांच्या नजरा आशिया कपवर (Asia Cup 2022) लागल्या आहेत. भारताचा पहिला सामना 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK) आहे, टीम इंडिया त्यासाठी सज्ज आहे.  आशिया चषक 2022 सुरू होण्यासाठी आता दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) रविवारी 14 ऑगस्ट रोजी स्पर्धेच्या सामन्यांच्या तिकिटांच्या विक्रीबाबत एक नवीन माहिती दिली. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, ACC ने सांगितले की आशिया कप 2022 च्या तिकिटांची विक्री सोमवार 15 ऑगस्टपासून सुरू केली जाईल. 27 ऑगस्टपासून दुबईत सुरू होणाऱ्या या स्पर्धेत 28 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या उच्च व्होल्टेज सामन्यासह स्पर्धेच्या सर्व सामन्यांची तिकिटे, अधिकृत तिकीट भागीदार  (platinumlist.net) वर उपलब्ध आहेत. चाहते या वेबसाइटद्वारे भारत विरुद्ध पाकिस्तानसह सर्व सामन्यांची तिकिटे बुक करू शकतात. (हे देखील वाचा: Asia Cup 2022: आशिया चषकापूर्वी पाकिस्तानला धक्का, शाहीन आफ्रिदीला भारताविरुद्ध खेळणे कठीण!)

Tweet

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार सामना

भारत आणि पाकिस्तान सामन्यांच्या तिकिटांना नेहमीच जास्त मागणी असते. 23 ऑक्टोबर रोजी MCG येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आगामी T20 विश्वचषक सामन्याची सर्व तिकिटे आधीच विकली गेली आहेत. अधिकृत घोषणेमध्ये, ACC ने सांगितले की आशिया कपच्या तिकिटांची विक्री 15 ऑगस्टपासून सुरू होईल. या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमची क्षमता सुमारे 25,000 आहे. पहिल्याच दिवशी या महान सामन्याची सर्व तिकिटे विकली जाण्याची शक्यता आहे.