IND vs WI: 'या' खेळाडूने अनेक सामने जिंकले स्वबळावर, आता प्लेइंग-11 मध्ये मिळत नाही स्थान
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात फिरकीपटू कुलदीप यादवचे (Kuldeep Yadav) प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन झाले असले तरी त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही.
भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील चौथा T20 सामना फ्लोरिडा येथील सेंट्रल बॉर्डर पार्कवर खेळला गेला. भारताने हा सामना 59 धावांनी जिंकून पाच सामन्यांची T20I मालिका 3-1 ने जिंकली. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाने (Team India) तयारी सुरू केली आहे. यासाठी संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) नवनवे प्रयोग करत आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यातही अनेक बदल पाहायला मिळाले. पण टीम इंडियाच्या या जादूई फिरकीपटूला अद्याप एकही संधी मिळालेली नाही. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात फिरकीपटू कुलदीप यादवचे (Kuldeep Yadav) प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन झाले असले तरी त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही.
कुलदीप यादव टीम इंडियाचा चांगला फिरकीपटू आहे. टीम इंडियासाठी कठीण काळात तो विकेट घेतो. त्याने अनेक सामन्यांमध्ये संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आहे, परंतु आता तो प्लेइंग-11 मध्ये आपले स्थान निर्माण करण्यात अपयशी ठरत आहे. IPL 2022 पासून कुलदीप यादवने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी त्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आला होता, मात्र दुखापतीमुळे तो संघाचा भाग होऊ शकला नाही. (हे देखील वाचा: IND W vs AUS W, CWG 2022 Cricket Live Streaming: सुवर्णपदक सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सामना?)
कुलदीप यादवने टीम इंडियासाठी आतापर्यंत 7 टेस्ट मॅचमध्ये 26 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर 66 एकदिवसीय सामन्यांमध्ये 109 आणि 59 टी-20 सामन्यात 61 बळी घेतले आहेत. यंदाच्या आयपीएलमध्येही त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी चांगली कामगिरी केली. त्याने 14 सामन्यात 21 विकेट घेतल्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)