Team India ला प्रोत्साहन देताना पिपाणीवाल्या आजीबाईचा क्युटनेस पाहून सौरभ गांगुली, हर्षा भोगले यांच्यासह Social Media फिदा

पण, स्टेडियममध्ये बसून संघाला प्रोत्साहन देताना तीने चौकार, षटकारांची आतषबाजी होताच पिपाणी वाजवून साजरा केलेला आनंद अनेकांच्या आकर्षणाचा आणि कुतुहलाचा विषय ठरला.

Old lady fan during India vs Bangladesh CWC Match (Photo Credits: Twitter)

Icc Cricket World Cup 2019:  जीवनात आनंद आणि समाधान मिळवायला तुम्हाला तरुणच असण्याची अजिबात गरज नाही. ज्याला आनंद मिळवायचा आहे आणि प्रत्येक क्षण उत्सव म्हणून उत्साहाने साजरा करायचा आहे अशा व्यक्तीला वयाचे कोणतेच बंधन असत नाही. आयसीसी वर्ल्ड कप 2019 मध्ये भारती क्रिकेट संघ (Team India) प्रतिस्पर्धी संघाशी भिडत असताना एक आजीबाई सर्वांचे लक्ष वेधून गेत होत्या. टीम इंडियाला प्रोत्साहन देताना आजीबाईंचा उत्साह पाहून आजूबाजूचे क्रिडा रसिकच नव्हे तर, चक्क सामन्याचे समालोचन करणाऱ्या सौरभ गांगुली (Sourav Ganguly) व हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनीही या आजीबाईच्या उत्साहाची दखल घेत कौतुक केले. या आजीबाईंचा पिपाणी वाजवत भारतीय क्रिकेट संघाला प्रोत्साहन देतानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियवर व्हायरल झाला आहे.

भारतीय क्रिकेट संघाला आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत चिअरप करणारी ही आजीबाई नेमकी कोण, कुठली आहे हे माहित नाही. पण, स्टेडियममध्ये बसून संघाला प्रोत्साहन देताना तीने चौकार, षटकारांची आतषबाजी होताच पिपाणी वाजवून साजरा केलेला आनंद अनेकांच्या आकर्षणाचा आणि कुतुहलाचा विषय ठरला. इतका की आजीबाईचा हा उत्साह आणि वेगळेपणा कॅमेरामनलाही आपल्या कॅमेऱ्यात कैद करावासा वाटला. भारतीय फलंदाजांनी चौकार, षटकार ठोकला की, आजीबाई लहान मुलांसारखी पिपाणी वायवायची. विशेष म्हणजे या आजीबाईंनी आपल्या दोन्ही गालांवर भारताचा झेंडा रंगवून घेतला होता. (हेही वाचा, ICC World Cup 2019: ट्विटर वरील देवानं कॉपी केलं क्रिकेटच्या देवाचं ट्विट, हे प्रकरण नेमकं आहे काय?)

आजिबाईंना पाहून सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया पाहा

हा युजर्स काय म्हणतोय?

देव तिला अनेक आशीर्वाद दे

किती गोड हास्य

आजिबाईचे कौतुक करणारं हे आणखी एक ट्विट

या आजीबाईंची छबी कॅमेऱ्याच्या माध्यमातून टीव्हीवर झळकताच तिचे हे फोटो सोशल मीडियवर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या फोटोंना सोशल मीडियावर अनेक युजर्सनी शेअर, लाईक केले आहे. इतके की आजीबाईंच्या ‘क्युटनेस’वर सोशल मीडिया जणू फिदाच झाला आहे.