IPL Auction 2023: आयपीएलमध्ये 'या' भक्कम खेळाडूंना बनवले जावू शकते कर्णधार, आतापर्यंतचा उत्कृष्ट आहे रेकॉर्ड
यातील काही खेळाडू त्यांच्या राष्ट्रीय संघांचे कर्णधारही आहेत. त्यामुळे ज्या खेळाडूंना आयपीएलमध्येही कर्णधारपद मिळू शकते.
IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) साठी लिलाव उद्या म्हणजेच शुक्रवारी 23 डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. यावेळी लिलावादरम्यान अनेक खेळाडूंच्या नजरा फ्रँचायझींवर असतील. लिलावासाठी सर्व संघांनी तयारी पूर्ण केली आहे. अशा परिस्थितीत आयपीएल 2023 साठी अनेक संघ नवीन कर्णधारांच्या शोधात असतील. आयपीएलच्या 16व्या आवृत्तीसाठी 403 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यातील काही खेळाडू त्यांच्या राष्ट्रीय संघांचे कर्णधारही आहेत. त्यामुळे ज्या खेळाडूंना आयपीएलमध्येही कर्णधारपद मिळू शकते. या यादीत बेन स्टोक्स, केन विल्यमसन आणि जेसन होल्डर यांचा समावेश आहे.
यंदाच्या आयपीएल लिलावात सहभागी होण्यासाठी जगभरातून 991 खेळाडूंनी नोंदणी केली होती. मात्र अंतिम यादीत 405 खेळाडू आहेत. या 405 खेळाडूंपैकी 273 भारतीय आणि 132 बाहेरचे आहेत. पुढील आयपीएलसाठी, 87 स्लॉट रिक्त आहेत, ते भरण्यासाठी 405 खेळाडू बोली लावतील. या मिनी लिलावात खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात पैशांचा वर्षाव होणार आहे. पण काही खेळाडू असे आहेत जे यावेळी लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडू शकतात. (हे देखील वाचा: IPL 2023 Auction Live Streaming Online: शुक्रवारी होणार आयपीएलचा मिनी लिलाव, कधी आणि कुठे पाहणार? घ्या जाणून)
बेन स्टोक्स
इंग्लंडचा महान अष्टपैलू बेन स्टोक्स हा आयपीएलच्या शेवटच्या हंगामाचा भाग नव्हता. पण यावेळी बेन स्टोक्स आयपीएल लिलावात उपलब्ध असेल. आयपीएल 2023 च्या लिलावात बेन स्टोक्सची मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. जो रूटने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर बेन स्टोक्सला इंग्लंडचा कसोटी कर्णधार बनवण्यात आले. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली संघानेही चमकदार कामगिरी केली. सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज आयपीएलमध्ये कर्णधाराच्या शोधात असतील. त्यामुळे हे संघ बेन स्टोक्सवर मोठी पैज लावू शकतात.
केन विल्यमसन
आयपीएलच्या शेवटच्या मोसमात न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसनला काही विशेष करता आले नाही. कर्णधारपदासोबतच केन विल्यमसनलाही आपल्या कामगिरीची छाप सोडता आली नाही. केन विल्यमसनला हैदराबादने नोव्हेंबरमध्ये सोडले आहे. पण त्याने आपल्या राष्ट्रीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने यावेळी टी-20 विश्वचषकात उपांत्य फेरी गाठली. त्यामुळे सीएसके, पंजाब सारखे संघ त्याच्यावर सट्टा लावू शकतात.
जेसन होल्डर
वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलू जेसन होल्डरने अनेक प्रसंगी आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. जेसन होल्डरने फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही अप्रतिम कामगिरी केली आहे. जेसन होल्डरला 2015 मध्ये वेस्ट इंडिज संघाचे एकदिवसीय कर्णधारपद देण्यात आले होते. त्याला लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल 2022 मध्ये 8.75 कोटींना विकत घेतले होते. पण गेल्या मोसमात जेसन होल्डरला काही आश्चर्यकारक करता आले नाही. यावेळी मात्र तो कर्णधार म्हणून दिसणार आहे. हैदराबाद जेसन होल्डरला कर्णधार बनवू शकते.