CSK vs PBKS, IPL 2025 49th Match Key Players: पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात 'हे' खेळाडू करु शकतात कहर, बदलू शकतात सामन्याता मार्ग

चेन्नईला 9 पैकी फक्त दोन सामने जिंकता आले आहेत. सीएसके 4 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये 10 व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्ज 9 सामन्यांत 5 विजयांसह पाचव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत, पंजाब संघ चेन्नईच्या खराब फॉर्मचा फायदा घेऊन पॉइंट टेबलमध्ये आपले स्थान मजबूत करू इच्छितो.

CSK vs PBKS, IPL 2025 49th Match Key Players: पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात 'हे' खेळाडू करु शकतात कहर, बदलू शकतात सामन्याता मार्ग
CSK vs PBKS (Photo Credit- X)

CSK vs PBKS 49th Match: आयपीएल 2025 च्या 49 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज (CSK vs PBKS) आमनेसामने येणार आहेत. हा सामना चेन्नईचा बालेकिल्ला असलेल्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. चेन्नईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडला असला तरी, त्यांचा प्रयत्न घरच्या चाहत्यांना विजयाची भेट देण्याचा असेल. चेन्नईला 9 पैकी फक्त दोन सामने जिंकता आले आहेत. सीएसके 4 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये 10 व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्ज 9 सामन्यांत 5 विजयांसह पाचव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत, पंजाब संघ चेन्नईच्या खराब फॉर्मचा फायदा घेऊन पॉइंट टेबलमध्ये आपले स्थान मजबूत करू इच्छितो.

हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज 31 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये पंजाब संघाने 15 वेळा विजय मिळवला आहे. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने पंजाब किंग्जला 16 वेळा पराभूत केले आहे. तथापि, गेल्या 5 सामन्यांमध्ये पंजाब संघाने वरचढ कामगिरी केली आहे. पंजाबने 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत.

सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळांडूवर

शिवम दुबे: चेन्नई सुपर किंग्जचा स्फोटक फलंदाज शिवम दुबेने गेल्या 10 सामन्यांमध्ये 379 धावा केल्या आहेत. यादरम्यान, शिवम दुबेने 179.32 च्या स्फोटक स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. शिवम दुबेची आक्रमक फलंदाजी सीएसकेसाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

रवींद्र जडेजा: चेन्नई सुपर किंग्जचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने 349 धावा केल्या आहेत. या काळात रवींद्र जडेजाने 61 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. जर रवींद्र जडेजा स्थिरावला तर तो विरोधी गोलंदाजांसाठी मोठ्या समस्या निर्माण करू शकतो.

नूर अहमद: चेन्नई सुपर किंग्जचा घातक गोलंदाज नूर अहमदने गेल्या आठ सामन्यांमध्ये आतापर्यंत 17 विकेट्स घेतल्या आहेत. या काळात, नूर अहमदने 7.44 च्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली आहे. मधल्या षटकांमध्ये नूर अहमदची गोलंदाजी विरोधी संघांचे कंबरडे मोडू शकते. गेल्या सामन्यात नूर अहमदने घातक गोलंदाजी केली होती.

श्रेयस अय्यर: पंजाब किंग्जचा नवा कर्णधार श्रेयस अय्यर या हंगामात संघाचा एक मजबूत आधारस्तंभ म्हणून उदयास आला आहे. मधल्या फळीत त्याची फलंदाजी सामन्याला स्थिरता देते आणि जेव्हा जेव्हा संघाला जलद धावांची आवश्यकता असते तेव्हा अय्यर जबाबदारी घेतो. त्याचा अनुभव आणि आक्रमक शैली कोणत्याही गोलंदाजीच्या आक्रमणाला आव्हान देण्यास सक्षम आहे.

युजवेंद्र चहल: अनुभवी लेग स्पिनर युजवेंद्र चहल नेहमीच विकेट घेण्याच्या मानसिकतेने गोलंदाजी करतो. कोलकाताच्या मधल्या फळीला तोडण्यात त्याची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. चहलचा अनुभव आणि विविधता त्याला या सामन्यात पंजाबचा ट्रम्प कार्ड बनवू शकते.

अर्शदीप सिंग: पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग नवीन चेंडूने आणि डेथ ओव्हर्समध्ये विकेट घेण्यात माहिर आहे. त्याचे अचूक यॉर्कर आणि स्विंग चेंडू विरोधी फलंदाजांना त्रास देऊ शकतात. कोलकाताच्या आक्रमक सलामीवीरांविरुद्ध अर्शदीपची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे.

दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर

चेन्नई सुपर किंग्ज: शेख रशीद, आयुष म्हात्रे, दीपक हुडा, सॅम कुरन, रवींद्र जडेजा, देवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), नूर अहमद, खलील अहमद आणि मथिशा पाथिराना.

पंजाब किंग्स: प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), नेहल वढेरा, शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल, अजमतुल्ला उमरझाई, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.

(The above story first appeared on LatestLY on Apr 30, 2025 07:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).