IND vs AUS Test Series: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत 'या' भारतीय गोलंदाजांनी घेतले आहे सर्वाधिक बळी; पहा संपूर्ण यादी
या हाय व्होल्टेज मालिकेसाठी टीम इंडियाने तयारी केली आहे. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियन संघ देखील बेंगळुरूमध्ये विशेष तयारीमध्ये व्यस्त आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy 2023) 9 फेब्रुवारीपासून नागपुरात सुरू होत आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान खेळवला जाणार आहे. या हाय व्होल्टेज मालिकेसाठी टीम इंडियाने तयारी केली आहे. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियन संघ देखील बेंगळुरूमध्ये विशेष तयारीमध्ये व्यस्त आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला त्यांच्या गोलंदाजांकडून मोठ्या अपेक्षा असतील. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना खूप त्रास दिला आहे. चला मग जाणून घेऊया ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्या गोलंदाजांनी सर्वाधिक खळबळ माजवली आहे. (हे देखील वाचा: IND vs AUS Test Series: चेतेश्वर पुजारा मायकल क्लार्क आणि राहुल द्रविडला टाकु शकतो मागे, इतक्या धावापासुन आहे लांब)
या गोलंदाजांनी घेतल्या आहेत सर्वाधिक विकेट
अनिल कुंबळे
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम भारताचा माजी गोलंदाज अनिल कुंबळेच्या नावावर आहे. अनिल कुंबळेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 20 सामन्यांच्या 38 डावांत 111 विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अनिल कुंबळेने 30.32 च्या सरासरीने विकेट्स घेतल्या आहेत.
हरभजन सिंह
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत टीम इंडियाचा माजी अनुभवी गोलंदाज हरभजन सिंह दुसऱ्या क्रमांकावर आहे. हरभजन सिंहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 18 सामन्यांच्या 35 डावांत 95 बळी घेतले आहेत. यादरम्यान हरभजन सिंहची गोलंदाजीची सरासरी 29.55 होती.
आर अश्विन
या यादीत टीम इंडियाचा स्टार गोलंदाज आर अश्विनचेही नाव आहे. आर अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 18 सामन्यांच्या 34 डावांमध्ये 31.48 च्या गोलंदाजीच्या सरासरीने 89 बळी घेतले आहेत. यावेळी आर अश्विनही या यादीत पुढे जाऊ शकतो.
कपिल देव
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि महान अष्टपैलू कपिल देव या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. कपिल देव यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 20 सामन्यांच्या 38 डावांत 79 विकेट घेतल्या आहेत. कपिल देव यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 25.35 च्या अप्रतिम गोलंदाजी सरासरीने गोलंदाजी केली आहे.