IPL Auction 2025 Live

IND vs ZIM: पुढील सामन्यात 'या' चार फलंदाजावर असु शकते नजर, उपांत्य फेरीतही दाखवु शकतात आपली कमाल

त्याचबरोबर बांगलादेशला हरवून टीम इंडिया विजयाच्या मार्गावर परतली आहे.

Team India (Photo Credit - Twitter)

या विश्वचषक 2022 (T20 WC 2022) मध्ये भारतीय संघ (Team India) 4 सामने खेळला आहे, ज्यामध्ये 3 जिंकले आहेत आणि 1 हरला आहे. भारतीय संघाचा पुढील सामना झिम्बाब्वेसोबत (IND vs ZIM) आहे जो 6 तारखेला होणार आहे. आपल्याला आशा आहे की हा सामना जिंकून भारताचा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल. शेवटच्या दोन सामन्यांबद्दल सांगायचे तर, दक्षिण आफ्रिकेने भारताचा 5 विकेट्सने पराभव केला आणि दाखवून दिले की टीम इंडियाला परिपूर्ण होण्यासाठी अजून खूप मेहनत करण्याची गरज आहे. त्याचबरोबर बांगलादेशला हरवून टीम इंडिया विजयाच्या मार्गावर परतली आहे. आज आम्ही तुम्हाला 4 भारतीय फलंदाजाबद्दल सांगणार आहोत जे उद्याच्या सामन्यात धमाकेदार कामगिरी करू शकतात.

1. विराट कोहली

नेहमीप्रमाणेच संघाच्या विजयाची जबाबदारी टीम इंडियाच्या रन मशीनवर असेल. गेल्या सामन्यातही कोहलीने कमाल केली होती. याआधीही त्याने दोन्ही सामन्यात शानदार 50 धावा केल्या होत्या. पुन्हा एकदा कोहलीला धावा काढायच्या आहेत. अन्यथा ते संघासाठी अडचणीचे ठरू शकते.

2. केएल राहुल

T20 विश्वचषक 2022 मध्ये सलामीवीर केएल राहुलचा फार्म हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय होता कारण त्याने गेल्या तीन सामन्यांमध्ये 4,9,9 धावा केल्या. पण बांगलादेशविरुद्ध अर्धशतक झळकावले. या खेळीत त्याने 32 चेंडूत 50 धावा केल्या. त्यामुळे त्याचा फार्म परत आल्याने तो पुढील सामन्यात चांगली कामगिरी करु शकतो. (हे देखील वाचा: AUS vs AFG: ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम; अफगाणिस्तानवर चार धावांनी केली मात, श्रीलंका बाहेर)

3. सूर्यकुमार यादव

सूर्यकुमारने विश्वचषकावर आपले वर्चस्व गाजवले आहे. जेव्हा त्याने पाकिस्तानचा यष्टिरक्षक-ओपनर मोहम्मद रिझवानला मागे टाकले आणि तो T20 फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान होणारा दुसरा भारतीय खेळाडू बनला आहे. त्याची या विश्वचषकात चांगली कामगिरी राहिली आहे त्यामुळे पुढील सामन्यात आणि उपांत्य फेरीत तो आपला अशाच जलवा दाखवु शकतो.

4. दिनेश कार्तिक

या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या वतीने दिनेश कार्तिकवर खूप आत्मविश्वास दाखवण्यात आला आहे. पंतऐवजी दिनेश कार्तिकला संघात स्थान देण्यात आले आहे. दिनेश कार्तिकला टीम इंडियाच्या भरवशावर राहावं लागेल ज्यासाठी त्याला वर्ल्डकपमध्ये भरवलं जात आहे.