एम एस धोनीच्या निवृत्तीनंतर या 3 खेळाडूंपैकी एक बनू शकतो टीम इंडिया चा विकेटकीपर
इथे आम्ही तुम्हाला तीन खेळाडूंबद्दल सांगणार आहोत जे धोनीची स्टंपमागील जागा घेऊ शकतात.
टीम इंडिया चा 'कॅप्टन कूल' महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या निवृत्तीची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. बीसीसीआय (BCCI) च्या अधिकाराने दिलेल्या माहितीनुसार इंग्लंड (England) मधील आयसीसी (ICC) विश्वकप भारताच्या शेवटच्या सामन्यातनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा करेल. पीटीआयला बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "धोनी कधीही निवृत्ती जाहीर करू शकतो. त्यानं देशासाठी खुप केलं आहे. याआधी त्यानं कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता कारण त्याला फलंदाजीवर लक्षकेंद्रित करायचे होते. सध्या वर्ल्ड कपमध्ये त्याचा फॉर्म चांगला नाही आहे त्यामुळे तो निवृत्ती जाहीर करू शकतो". (ICC World Cup 2019 मधील भारताचा अंतिम सामना बनणार एम एस धोनी चा टीम इंडिया साठी शेवटचा, जाणून घ्या)
मात्र, धोनीच्या निवृत्तीचा प्रश्न येताच अजून एक प्रश्न समोर येतो आणि तो म्हणजे, धोनीनंतर टीम इंडियाचा नवीन विकेटकीपर कोण असणार. इथे आम्ही तुम्हाला तीन खेळाडूंबद्दल सांगणार आहोत जे धोनीची स्टंपमागील जागा घेऊ शकतात.
रिषभ पंत (Rishabh Pant)
पंत भारतीय संघाचा एक महत्वाचा भाग म्हणून आयसीसी विश्वकप खेळात आहे. आतापर्यंत पंतने आपल्या कामगिरीने दर्शक आणि निवड समितीला प्रभावित केले आहे. पंत हा धोनीच्या मुख्य उत्तराधिकारी मानला जात आहे. पंत भारतासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये विकेटकिपिंग करतो. त्याने ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध टेस्ट मालिकेत विकेटकिपिंग सांभाळली होती. त्यात तो बराच यशस्वी देखील झाला होता.
के एल राहुल (KL Rahul)
लोकेश राहुल, भारतीय क्रिकेटमधील तारा ही एक विकेटकीपर-फलंदाज आहे. रिषभ पंतच्या नंतर राहुलचे विकेटकीपर म्हुणुन विचारात येते. राहुलला विकेटकिपिंग चा अनुभव आहे. त्याने आयपीएल मध्ये आपल्या संघासाठी विकेटकिपिंग केली आहे. आणि त्यात त्याने सुंदर काम केले आहेत.
संजू सॅमसन (Sanju Samson)
ऑस्ट्रेलिया चा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न (Shane Warne) याने संजू सॅमसन ला भारतीय क्रिकेटच्या पुढील सुपरस्टार म्हणून संबोधित केले होते. धोनीची बदली म्हणून संजू आमची पुढील निवड आहे. सध्या संजू आयपीएल मध्ये राजस्थान रॉयल्स चे प्रतिनिधित्व करतोय. विकेटकीपिंग व्यतिरिक्त त्यांनी फलंदाजीमध्येही चांगले प्रदर्शन केले आहे. आयपीएलमध्ये 1000 धावा करणारा संजू हा सर्वात लहान भारतीय खेळाडू आहे. त्याने स्वबळावर संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत.