Shreyas Iyer Replacement: श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाच्या प्लेइंग XI मध्ये श्रेयस अय्यरला हे खेळाडू करू शकतात रिप्लेस
अय्यरच्या बाहेर जाण्यामुळे इतर बर्याच खेळाडूंसाठी दार उघडू शकते आणि 3 खेळाडूभारतीय संघात त्याची जागा घेऊ शकतात.
Shreyas Iyer Replacement: इंग्लंडविरुद्ध (England) मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त भारतीय मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. यामुळे त्याला इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या संपूर्ण हंगामातून माघार घ्यावी लागली होती. तथापि, शस्त्रक्रिया करून अय्यर हळूहळू आपल्या तंदुरुस्तीवर काम करत आहे. नुकतंच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने जुलै महिन्यात श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) मर्यादित ओव्हरच्या मालिकेसाठी आणखी एक भारतीय संघ (Indian Team) पाठवणार असल्याचं घोषित केलं होतं. फिट होऊन अय्यर श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व करेल असे सर्वांना अपेक्षित होतं तथापि, अद्याप अय्यर दुखापतीतून सावरलेला नसल्यामुळे तो श्रीलंका दौऱ्यासाठी उपलब्ध होणार नाही. अय्यरच्या बाहेर जाण्यामुळे इतर बर्याच खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनचे दार उघडू शकते आणि 3 खेळाडूंबद्दल जाणून घेऊया जे भारतीय संघात त्याची जागा घेऊ शकतात. (Shreyas Iyer Injury Update: व्हिडिओ शेअर करत श्रेयस अय्यरने दिला फिटनेस अपडेट, श्रीलंका दौऱ्यावर संधी मिळण्यावर संभ्रम कायम)
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)
घरगुती क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या यादवने नुकतंच इंग्लंडविरुद्ध दमदार कामगिरी करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली पाऊल ठेवले. सूर्यकुमारने 2 डावात 185.42 च्या स्ट्राइक रेटने 89 धावा केल्या होत्या आणि या उत्तम कामगिरीमुळे सूर्यकुमारला श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. यादव मोठी खेळी खेळण्यात तज्ज्ञ आहेत. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापनाची पहिली पसंती बनू शकतो. श्रीलंकेच्या स्लो खेळपट्ट्यांवर सूर्यकुमार मध्य क्रमातील भारतासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो.
ईशान किशन (Ishan Kishan)
आयपीएल 2021 मध्ये ईशान किशनला फारसे प्रभावित करता आलेले नाही. किशनने 5 सामन्यांत केवळ 73 धावा केल्या. श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका किशनसाठी सुवर्णसंधी ठरू शकते आणि अय्यरच्या अनुपस्थितीत किशनला भारतीय संघासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळू शकते.
संजू सॅमसन (Sanju Samson)
संजू सॅमसन आतापर्यंत भारतीय संघासाठी फक्त 7 टी-20 सामने खेळला आहे पण त्याला अद्याप एकदिवसीय संघात संधी मिळाली नाही. आगामी श्रीलंकेच्या दौर्यासाठी सॅमसनला निश्चितच संघात स्थान मिळेल आणि आयपीएलचा अनुभव पाहता त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये डेब्यूची संधी मिळेल. शिवाय, श्रीलंकाविरुद्ध मालिका ही भारताच्या मुख्य संघात दावेदारी दर्शवण्यासाठी सॅमसनसाठी सुवर्णसंधी ठरू शकते. अय्यरच्या जागी सॅमसन सहजपणे एक चांगला पर्याय असेल.