RCB vs PBKS Final Winner Prediction: जेतेपदाच्या सामन्यासाठी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार जोरदार लढत, सामना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
2022 नंतर पहिल्यांदाच आयपीएलला नवा चॅम्पियन मिळणार असल्याने या जेतेपदाच्या सामन्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे दोन्ही संघ 18 वर्षांपासून त्यांच्या पहिल्या आयपीएल ट्रॉफीच्या (IPL 2025 Final) शोधात आहेत. त्यापैकी एकाचे स्वप्न आज पूर्ण होणार आहे.
Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings IPL 2025 Final: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. 2022 नंतर पहिल्यांदाच आयपीएलला नवा चॅम्पियन मिळणार असल्याने या जेतेपदाच्या सामन्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे दोन्ही संघ 18 वर्षांपासून त्यांच्या पहिल्या आयपीएल ट्रॉफीच्या (IPL 2025 Final) शोधात आहेत. त्यापैकी एकाचे स्वप्न आज पूर्ण होणार आहे. या संपूर्ण हंगामात बंगळुरू आणि पंजाब (Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings) दोन्ही संघांची कामगिरी सर्वोत्तम राहिती होती.
दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक अंतिम सामना अपेक्षित
क्वालिफायर 1 मध्ये आरसीबीने पंजाबचा पराभव केला आणि अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले तर पंजाबने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक अंतिम सामना अपेक्षित आहे. (हे देखील वाचा: RCB vs PBKS Final, Ahmedabad Weather Forecast: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज आयपीएल फायनल सामन्यामध्ये पाऊस गोंधळ घालेल? कसे असेल सामन्यादरम्यान वातावरण? जाणून घ्या)
बंगळुरू आणि पंजाब हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएलच्या इतिहासात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात एकूण 36 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये आरसीबीने 18 सामने जिंकले आहेत आणि पीबीकेएसने 18 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांनी समान सामने जिंकले आहेत. आकडेवारीवर विश्वास ठेवला तर, दोन्ही संघांमध्ये नेहमीच तीव्र स्पर्धा राहिली आहे आणि कोणीही अंतिम सामना जिंकू शकतो, कोणताही संघ फेव्हरिट नाही. तथापि, दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या गेल्या 5 सामन्यांमध्ये आरसीबीने वरचढ कामगिरी केली आहे. आरसीबीने 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत.
'हा' संघ जिंकू शकतो (PBKS vs MI Match Winner Prediction)
सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा वरचष्मा दिसतो. हा सामना पंजाब किंग्जसाठी आव्हानात्मक असू शकतो, विशेषतः रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या मजबूत गोलंदाजी आणि फलंदाजीविरुद्ध. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या अलीकडील कामगिरीकडे पाहता, ते स्पर्धेतील अंतिम सामना जिंकू शकतात. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळतो.
मुंबई इंडियन्सच्या जिंकण्याची शक्यता: 52%
पंजाब किंग्जच्या जिंकण्याची शक्यता: 48%.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
पंजाब किंग्ज: प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, जोश इंग्लिस (विकेटरीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वधेरा, शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस, अझमतुल्लाह उमरझाई, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग आणि काइल जेमीसन.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फिल सॉल्ट, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेजलवुड, सुयश शर्मा
(The above story first appeared on LatestLY on Jun 03, 2025 03:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

