CSK vs SRH IPL 2025 43rd Match Live Streaming: आज चेन्नई आणि हैदराबादमध्ये होणार जोरदार लढत, त्याआधी जाणून घ्या कुठे पाहणार लाईव्ह सामना
चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या आठ सामन्यांपैकी फक्त दोनच सामने जिंकले आहेत आणि ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहेत, तर हैदराबादचा संघ देखील नवव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांना गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते आणि आता या सामन्यातील पराभवामुळे ते प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडतील.
Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad, 43rd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 43 वा सामना, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद 25 एप्रिल (शुक्रवार) रोजी एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. या हंगामात दोन्ही संघ आतापर्यंत संघर्ष करत असल्याने हा लीग टप्प्यातील एक अतिशय महत्त्वाचा सामना असेल. चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या आठ सामन्यांपैकी फक्त दोनच सामने जिंकले आहेत आणि ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहेत, तर हैदराबादचा संघ देखील नवव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांना गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते आणि आता या सामन्यातील पराभवामुळे ते प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडतील. अशा परिस्थितीत, आजचा सामना 'करो या मरो' असेल.
हेड टू हेड रेकाॅर्ड (SRH vs CSK Head to Head)
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत 21 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी सीएसकेने 15 सामने जिंकले आहेत, तर हैदराबादने 6 वेळा विजय मिळवला आहे. 2024 मध्ये दोन्ही संघ दोनदा एकमेकांसमोर आले. सीएसकेने एक सामना 78 धावांनी जिंकला, तर सनरायझर्स हैदराबादने दुसरा सामना 8 विकेट्सने जिंकला. (हे देखील वाचा: Sanju Samson Injury Update: संजू सॅमसन कधी परतणार? मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सॅमसनच्या दुखापतीबद्दल दिले मोठे अपडेट)
किती वाजता सुरु होणार सामना?
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आयपीएल 2025 चा 43 वा सामना गुरुवार, 25 एप्रिल रोजी खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. या सामन्यात दोन्ही संघांचे कर्णधार टॉसच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी 7 वाजता मैदानावर असतील.
कुठे पाहणार लाईव्ह सामना?
भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्क तसेच स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर टीव्हीवर CSK विरुद्ध SRH आयपीएल 2025 चा 43 वा सामना थेट पाहू शकतील. येथे वेगवेगळ्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये समालोचन ऐकण्यासाठी उपलब्ध असेल. तसेच सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही JioHotstar वर पाहू शकाल. येथे तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांमध्ये समालोचन ऐकायला मिळेल.
(The above story first appeared on LatestLY on Apr 25, 2025 03:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

