AUS W vs ENG W Only Test 2025 Live Streaming: एकमेव कसोटीत सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होणार जोरदार लढत, भारतात कधी, कुठे आणि कसा घेणार लाईव्ह सामन्याचा आनंद? घ्या जाणून

पहिल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचा 3-0 असा पराभव केला. त्यानंतर टी-20 मालिकेतही पाहुण्या संघाचा 3-0 असा व्हाईटवॉश झाला. आता ऑस्ट्रेलियाचे लक्ष कसोटी सामन्यावर आहे.

AUS W vs ENG W Only Test 2025 Live Streaming: एकमेव कसोटीत सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होणार जोरदार लढत, भारतात कधी, कुठे आणि कसा घेणार लाईव्ह सामन्याचा आनंद? घ्या जाणून
ENG W vs AUS W (Photo Credit - X)

Australia Womens National Cricket vs England Womens National Cricket Team Only Test 2025 Live Streaming: महिला अ‍ॅशेस 2025 मध्ये ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात 30 जानेवारीपासून मेलबर्नमधील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर एकमेव कसोटी सामना होणार आहे. या अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे, त्यांनी सलग सहा सामने जिंकले आहेत. पहिल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचा 3-0 असा पराभव केला. त्यानंतर टी-20 मालिकेतही पाहुण्या संघाचा 3-0 असा व्हाईटवॉश झाला. आता ऑस्ट्रेलियाचे लक्ष कसोटी सामन्यावर आहे. (हे देखील वाचा: WI W vs BAN W 2nd T20 2025 Live Streaming: वेस्ट इंडिज-बांगलादेश यांच्यातील सान्याचे भारतात कधी, कुठे आणि कसा लाईव्ह पहाल?)

पाहुणा संघ अजूनही पहिल्या विजयाच्या शोधात

दुसरीकडे, इंग्लंड संघासाठी हा दौरा खूपच वाईट राहिला आहे. पाहुणा संघ अजूनही पहिल्या विजयाच्या शोधात आहे. अशा परिस्थितीत, ते एकमेव कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला कडक लढत देण्याचा प्रयत्न करेल आणि तिचा पहिला विजय नोंदवू इच्छिते. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळतो.

कधी खेळला जाणार सामना?

ऑस्ट्रेलिया महिला आणि इंग्लंड महिला यांच्यातील एकमेव कसोटी सामना गुरुवार, 30 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 8.50 वाजता मेलबर्नमधील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल.

कुठे पाहणार सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण?

भारतात, ऑस्ट्रेलिया महिला आणि इंग्लंड महिला एकमेव कसोटी सामना स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर थेट प्रक्षेपित केली जाईल. तर लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने+हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत, चाहते येथून लाइव्ह सामन्याचा आनंद घेऊ शकतात.

दोन्ही संघांचे खेळाडू

इंग्लंड कसोटी संघ: हीथर नाईट (कर्णधार), टॅमी ब्यूमोंट, लॉरेन बेल, माया बोचियर, केट क्रॉस, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फाइलर, बेस हीथ, एमी जोन्स, रियाना मॅकडोनाल्ड-गे, नॅट सायव्हर-ब्रंट, डॅनी व्याट-हॉज

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ: एलिसा हिली (कर्णधार), डार्सी ब्राउन, अ‍ॅशले गार्डनर, किम गार्थ, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा, बेथ मूनी (यष्टीरक्षक), एलिस पेरी, मेगन शट, अ‍ॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वॉल, जॉर्जिया वेअरहॅम.

(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2025 12:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).