IND vs SA T20 World Cup 2024 Final: टॉस द बॉस! आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघच ट्रॉफीवर करणार कब्जा? आकडेवीरी देत आहे साक्ष
नाणेफेक मुख्यतः खेळपट्टी आणि हवामानावर अवलंबून असते कारण विजेत्या संघाला प्रथम फलंदाजी किंवा गोलंदाजी करून अधिक फायदा होईल की नाही. पण आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 8 आयसीसी टी-20 विश्वचषक फायनलमध्ये टॉसचे धक्कादायक आकडे पाहायला मिळत आहेत.
IND vs SA ICC T20 World Cup 2024 Final: टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (IND vs SA T20 World Cup 2024 Final) भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकाशी (IND vs SA) होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे आज म्हणजेच 29 जून रोजी रात्री 8 वाजता खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघाच्या टी-20 वर्ल्ड कपबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडिया 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अंतिम फेरीत पोहोचली आहे. तर दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकानं आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे दोन्ही संघानां आज जगज्जेते होण्याची सुवर्णसंधी आहे. (हे देखील वाचा: IND vs SA ICC T20 World Cup 2024 Final Live Streaming: आज जगाला मिळणार टी-20 क्रिकेटचा बादशाह, भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना; थोड्याच वेळात येथे पाहू शकता लाइव्ह)
टाॅस ठरणार एक्स फॅक्टर
नाणेफेक कधीकधी सामन्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. नाणेफेक मुख्यतः खेळपट्टी आणि हवामानावर अवलंबून असते कारण विजेत्या संघाला प्रथम फलंदाजी किंवा गोलंदाजी करून अधिक फायदा होईल की नाही. पण आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 8 आयसीसी टी-20 विश्वचषक फायनलमध्ये टॉसचे धक्कादायक आकडे पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 8 टी-20 विश्वचषकात 7 वेळा नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने अंतिम सामना जिंकला आहे. केवळ एकदाच नाणेफेक हरलेल्या संघाने टी-20 विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा केला आहे. टी-20 विश्वचषक 2009 च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, पण पाकिस्तानने हा सामना 8 विकेटने जिंकला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणारे संघ
आतापर्यंत खेळल्या गेलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक फायनलमध्ये फक्त तीन वेळा नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यापैकी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणारा संघ अंतिम सामन्यात पराभूत झाल्याचे एकदाच घडले आहे. 2009 मध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण पाकिस्तानने हा सामना 8 विकेटने जिंकला.
ज्या संघांनी नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली
आयसीसी टी-20 विश्वचषक फायनलमध्ये आतापर्यंत 5 वेळा नाणेफेक जिंकलेल्या संघांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आश्चर्यकारक आकडेवारी म्हणजे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या पाचही संघांनी टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकली आहे.