GT vs RR, TATA IPL 2025 23rd Match Stats And Preview: गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात थोड्याच वेळात सुरु होणार सामना, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' अनोखे विक्रम

गुजरात टायटन्सने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते 3 सामन्यात विजय तर एक सामना गमवावा लागला आहे. याशिवाय, ते पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सनेही आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते दोन जिंकले आणि दोन सामने गमवावे लागले आहे. अशा परिस्थितीत आज एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.

GT vs RR, TATA IPL 2025 23rd Match Stats And Preview: गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात थोड्याच वेळात सुरु होणार सामना, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' अनोखे विक्रम
RR vs GT (Photo Credit - X)

Gujarat Titans vs Rajasthan Royals IPL 2025 23rd Match: आयपीएल 2025 (Indian Premier League 2025) चा 23 वा सामना आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे. गुजरातचे नेतृत्व शुभमन गिल (Shubman Gill) करत आहे. तर, राजस्थानचे नेतृत्व संजू सॅमसनकडे (Sanju Samson) आहे. दोन्ही संघांचा हा चौथा सामना असेल. गुजरात टायटन्सने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते 3 सामन्यात विजय तर एक सामना गमवावा लागला आहे. याशिवाय, ते पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सनेही आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते दोन जिंकले आणि दोन सामने गमवावे लागले आहे. अशा परिस्थितीत आज एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.

हेड टू हेड रेकॉर्ड (GT vs RR Head to Head)

आयपीएलच्या इतिहासात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत एकूण सहा सामने खेळले गेले आहेत. या काळात, गुजरात टायटन्सने वरचढ कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्स संघाने पाच सामने जिंकले आहेत. तर, राजस्थान रॉयल्सने फक्त एकच सामना जिंकला आहे. या हंगामात दोन्ही संघांमधील ही पहिलीच भेट आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळला गेला होता. या काळात गुजरात टायटन्सने विजय मिळवला होता. आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सविरुद्धचा एकमेव विजय नोंदवला.

हे देखील वाचा: GT vs RR, TATA IPL 2025 23rd Match Key Players: गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर

आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम 

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध 500 धावा पूर्ण करण्यासाठी गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलला 56 धावांची आवश्यकता आहे.

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल आयपीएलमध्ये जीटीसाठी त्याचा 50 वा सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल टी-20 क्रिकेटमधील त्याचा 150 वा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे.

गुजरात टायटन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतिया आयपीएलमध्ये जीटीसाठी त्याचा 50 वा सामना खेळण्यास सज्ज आहे.

गुजरात टायटन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू रशीद खान आयपीएलमध्ये जीटीसाठी त्याचा 50 वा सामना खेळण्यास सज्ज आहे.

राजस्थान रॉयल्सचा घातक फलंदाज ध्रुव जुरेलला आयपीएलमध्ये राजस्थानसाठी 500 धावा पूर्ण करण्यासाठी 56 धावांची आवश्यकता आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये, राजस्थान रॉयल्सचा संजू सॅमसन त्याचा 300 वा टी-20 खेळण्यासाठी सज्ज आहे.

राजस्थान रॉयल्सचा स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायरला टी-20 क्रिकेटमध्ये पाच हजार धावा पूर्ण करण्यासाठी सात धावांची आवश्यकता आहे.

राजस्थान रॉयल्सचा स्टार गोलंदाज महेश थिकेशनाला टी-20 क्रिकेटमध्ये 200 विकेट्स पूर्ण करण्यासाठी चार विकेट्सची आवश्यकता आहे.

राजस्थान रॉयल्सचा स्टार गोलंदाज संदीप शर्मा टी-20 क्रिकेटमधील त्याचा 200 वा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).