Pakistan vs West Indies 1st Test 2025 Live Streaming: आजपासून पाकिस्तान-वेस्ट इंडिज यांच्यात पहिला कसोटी सामना रंगणार, भारतात कुठे घेणार थेट सामन्याचा आनंद? घ्या जाणून
वेस्ट इंडिज क्रिकेट संघ 18 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये पहिली कसोटी मालिका खेळणार आहे. वेस्ट इंडिजने 2006 मध्ये कसोटी मालिकेसाठी शेवटचा पाकिस्तानचा दौरा केला होता. तथापि, यादरम्यान त्यांनी दोन पांढऱ्या चेंडूच्या सामन्यांसाठी पाकिस्तानलाही भेट दिली आहे.
Pakistan National Cricket Team vs West Indies Cricket Team 1st Test 2025 Live Streaming: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघ यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना मुलतानमधील मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. वेस्ट इंडिज क्रिकेट संघ 18 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये पहिली कसोटी मालिका खेळणार आहे. वेस्ट इंडिजने 2006 मध्ये कसोटी मालिकेसाठी शेवटचा पाकिस्तानचा दौरा केला होता. तथापि, यादरम्यान त्यांनी दोन पांढऱ्या चेंडूच्या सामन्यांसाठी पाकिस्तानलाही भेट दिली आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत शान मसूद पाकिस्तानचे नेतृत्व करेल. तर वेस्ट इंडिजची धुरा क्रेग ब्रेथवेटवर असेल.
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना कधी खेळला जाईल?
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना गुरुवार, 17 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 10.00 वाजता मुलतानमधील मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. (हे देखील वाचा: Pakistan vs West Indies Test Stats: कसोटी मालिकेत पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजची एकमेकांविरुद्ध कशी आहे कामगिरी? सर्वाधिक धावा आणि विकेट्स घेणारे खेळाडू घ्या जाणून)
कुठे पाहणार सामना?
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेच्या दूरदर्शन प्रक्षेपणाबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही. परंतु कसोटी सामन्यांचे थेट प्रक्षेपण फॅनकोड अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
दोन्ही संघांचे खेळाडू
पाकिस्तान संघ: शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, इमाम-उल-हक, कामरान गुलाम, काशिफ अली, खुर्रम शहजाद, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिजवान (यष्टीरक्षक), नोमान अली, रोहेल नझीर (यष्टीरक्षक), साजिद खान आणि सलमान अली आगा.
वेस्ट इंडिज संघ: क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), जोशुआ दा सिल्वा (उपकर्णधार), अॅलिक अथानाझे, कीसी कार्टी, जस्टिन ग्रीव्हज, कावेम हॉज, टेविन इमलाच, आमिर जांगू (यष्टीरक्षक), मायकेल लुईस, गुडाकेश मोती, अँडरसन फिलिप, केमार रोच, केविन सिंक्लेअर, जेडेन सील्स आणि जोमेल वॉरिकन
(The above story first appeared on LatestLY on Jan 17, 2025 08:23 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

