Roy Torrance Died: आयर्लंडचे माजी क्रिकेटपटू रॉय टोरन्स यांचे निधन, वयाच्या 72 व्या वर्षा घेतला अखेरचा श्वास

वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

Roy Torrens (Photo Credit: Twitter)

आयर्लंडच्या (Ireland) संघातील माजी क्रिकेटर रॉय टोरन्स (Roy Torrens) यांचे आज (24जानेवारी) निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. क्रिकेट आयरलँड ट्विटर अकांऊटवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. रॉय टोरन्स यांच्या निधनावर संपूर्ण क्रिडा विश्वात शोककळा पसरली आहे. टेरेन्स यांच्या मृत्यूमुळे आयर्लंड क्रिकेट टीमचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या आयरलॅंडच्या संघ अफगाणिस्तान विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे.

रॉय टोरन्स हे अष्टपैलू खेळाडू होते. रॉय यांनी 1966 मध्ये मिडिलसेक्सविरुद्ध पहिला सामना खेळला होता. त्यांची क्रिकेट कारकिर्द एकूण 18 वर्षांची होती. 1966 ते 1984 दरम्यान त्यांनी एकूण 30 सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये त्यांनी 25.6 च्या सरासरीने 77 विकेट्स घेतल्या आहेत. हे देखील वाचा- IND vs ENG Series 2021: भारत-इंग्लंड यांच्यातील या मालिकेसाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या एन्ट्रीला BCCI ग्रीन सिग्नल देण्यास उत्सुक, पण एकच अडचण

ट्वीट-

इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत आयर्लंड 1-0 ने पिछाडीवर आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज (24 जानेवारी) खेळण्यात येत आहे. तर तिसरा आणि शेवटचा सामना 26 जानेवारीला अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहे.