Hardik Pandya Captaincy: हार्दिकच्या कर्णधार न होण्यामागचं मोठं कारण आलं समोर, मुख्य निवडकर्ता 'या' गोष्टीवर नव्हता समाधानी
पण आता काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स सोडल्यानंतर मुंबई इंडियन्सचे कर्णधार असताना पांड्याची कामगिरी काही खास नव्हती...
IND vs SL: टीम इंडिया आता श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि हार्दिक पांड्यासारखे (Hardik Pandya) जगज्जेते खेळाडू मैदानात परतत आहेत. या दौऱ्यासाठी संघाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न घोळत आहे की टी-20 मालिकेसाठी हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादवला (SuryaKumar Yadav) कर्णधारपद का देण्यात आले? कारण, हार्दिक टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार होता आणि त्याची कामगिरीही अप्रतिम होती. आता हार्दिकच्या कर्णधार न होण्यामागचं मोठं कारण समोर आलं आहे. (हे देखील वाचा: BCCI On Hardik Pandya: हार्दिक पांड्यासाठी बीसीसीआयचा नवा 'आदेश', आता त्याला द्यावी लागणार विशेष परीक्षा)
मुख्य निवडकर्ता आनंदी नव्हता
खरं तर, 2024 च्या टी-20 विश्वचषकानंतर चाहत्यांना आशा होती की, श्रीलंका दौऱ्यावर हार्दिक पांड्या टीम इंडियाचा कर्णधार असेल. पण आता काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स सोडल्यानंतर मुंबई इंडियन्सचे कर्णधार असताना पांड्याची कामगिरी काही खास नव्हती, त्यानंतर पांड्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर आता टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यास अनुकूल नव्हते. त्यांना कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव हवा होता. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, हार्दिक पांड्यापेक्षा सूर्यकुमार यादवचा संघाच्या ड्रेसिंग रूमवर जास्त प्रभाव आहे.
पांड्याच्या कर्णधारपदावर आगरकर आणि गंभीर समाधानी नाहीत
रोहित शर्माच्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर हार्दिक पांड्याकडे टीम इंडियाचा नवा कर्णधार म्हणून पाहिले जात होते. पण हार्दिकचे आयपीएल 2024 ज्या पद्धतीने पार पडले, त्यामुळे पांड्याच्या कर्णधारपदावर अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. हार्दिक जेव्हा कर्णधार होता तेव्हा ड्रेसिंग रूममधलं वातावरण तितकं चांगलं नसल्याचंही वृत्त समोर आलं होतं. त्याचवेळी हार्दिकने वैयक्तिक कारणांमुळे श्रीलंकेसोबतच्या वनडे मालिकेतून विश्रांती मागितली होती. आता या सर्व गोष्टींबाबत, प्रशिक्षक गौतम गंभीर आणि अजित आगकर हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर समाधानी नव्हते.