ENG vs AUS Ashes 2023 Live Streaming: आजपासून सुरू होणार इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस युद्ध, भारतात असे पाहु शकतात लाइव्ह

भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता हा सामना सुरू होईल. इंग्लंडने नुकतीच आयर्लंडविरुद्धची एकमेव कसोटी 10 गडी राखून जिंकली, तर ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा 209 धावांनी पराभव केला.

ENG vs AUS (Photo Credit - Twitter)

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यातील ऍशेस मालिकेतील (Ashes Series 2023) पहिला सामना 16 जून म्हणजे आज खेळवला जाणार आहे. 1882-83 मध्ये सुरू झालेली ऍशेस ही कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जुनी मालिका आहे. 2023 मध्ये खेळल्या जाणाऱ्या या मालिकेतील पहिला सामना बर्मिंगहॅममध्ये खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता हा सामना सुरू होईल. इंग्लंडने नुकतीच आयर्लंडविरुद्धची एकमेव कसोटी 10 गडी राखून जिंकली, तर ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा 209 धावांनी पराभव केला. या सामन्यात बेन स्टोक्स इंग्लंडचे नेतृत्व करत आहे, तर ऑस्ट्रेलियाची कमान पॅट कमिन्सकडे आहे.

कोण आहे कोणावर भारी?

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 72 ऍशेस मालिका खेळल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 34 वेळा विजय मिळवून आघाडी कायम राखली आहे. त्याचबरोबर इंग्लंडने 32 वेळा मालिका जिंकली आहे. याशिवाय 6 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. याआधी 2021-22 मध्ये झालेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 4-0 ने विजय मिळवला होता. दोघांमध्ये आतापर्यंत एकूण 340 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने 140 सामने जिंकले आहेत तर इंग्लंडने 108 सामने जिंकले आहेत.

भारतात कधी आणि कुठे पाहणार सामना

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेचे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे भारतात टीव्हीवर थेट प्रक्षेपण केले जाईल. तसेच या मालिकेचे लाइव्ह स्ट्रिमिंग 'सोनी LIV' अॅपवर केले जाईल, जिथे तुम्ही ते मोबाइलद्वारे थेट पाहू शकाल. (हे देखील वाचा: ENG vs AUS, Ashes Series 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेला शुक्रवारपासुन होणार सुरुवात, जाणून घ्या कोण आहे कोणावर भारी)

ऍशेस 2023 साठी दोन्ही संघांचे खेळाडू पहा

ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅट रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

इंग्लंड संघ: बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, मोईन अली, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, ऑली रॉबिन्सन, जो रूट, जोश टॉंग, ख्रिस वोक्स , मार्क वुड.