Thailand Open: सायना नेहवाल, किदांबी श्रीकांत यांची विजयी सलामी; सात्त्विक साईराज- अश्विनी पोनप्पा यांचा धक्कादायक विजय
भारतीय बॅडमिंटनची राणी सायना नेहवाल हिने महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी सायनाने स्थानिक फिट्टायपॉर्न चैवानवर सरळ सेटमध्ये विजय मिळवला. किदांबी श्रीकांत, एचएस प्रणय, परुपल्ली कश्यप आणि शुभंकर डे यांनी देखील दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे.
भारतीय बॅडमिंटनची राणी सायना नेहवाल (Saina Nehwal) हिने दुखापतीतून सावरत थायलंड ओपन (Thailand Open) बॅडमिंटन स्पर्धेत पुनरागमन केले आहे. महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी सायनाने स्थानिक फिट्टायपॉर्न चैवान (Phittayaporn Chaiwan) हिच्यावर सरळ सेटमध्ये विजय मिळवला. सुमारे दोन महिन्यांनंतर पुन्हा बॅडमिंटन कोर्टवर परतलेल्या सायनाने दुखापतीमुळे शेवटच्या मिनिटाला इंडोनेशिया ओपनमधून माघार घेतली. पण थायलंड ओपनच्या पहिल्याच फेरीत तिन चैवानला 21-17, 21-19 ने पराभूत केले. सातवे मानांकित प्राप्त साइन हीचा पुढील सामना जपानच्या सयाका ताकाहाशी (Sayaka Takahashi) शी होईल. (आपले खरे नाव ठेव! Global T20 लीगमध्ये ड्वेन ब्राव्हो याच्या जर्सी वर 'चॅम्पियन टॅग' पाहून सायमन डौल संतापले)
पुरुष दुहेरीत देखील भारतासाठी गोड बातमी आहे. किदांबी श्रीकांत (Kidambi Srikanth), एचएस प्रणय (HS Prannoy), परुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) आणि शुभंकर डे (Shubhankar Dey0 यांनी देखील दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. पण वर्मा बंधू-सौरभ आणि समीर पहिल्या फेरीत बाद झाले. प्रणॉयने हाँग काँगच्या वोंग विंग की व्हिन्सेंटचा 21-16, 22-20 असा पराभव केला, तर कश्यपने इस्त्राईलच्या मिशा झिलबर्मनला 18-21, 21-8, 21-14 अशी मात केली. प्रणय आणि कश्यप यांचा दुसऱ्या फेरीतील सामना जोरदार असणार. प्रणय याचा मुकाबला सहाव्या मानांकित जपाच्या केन्टा निशिमोतो यांच्याशी होईल, तर कश्यप समोर तैपेईच्या तिसऱ्या मानांकित चौ टिएन चेन याचे आव्हान आहे.
दरम्यान, मिश्र दुहेरीत सात्त्विक साईराज रंकीरेड्डी (Satwik Sairaj Rankireddy) आणि अश्विनी पोनप्पा (Ashwini Ponappa) या जोडीने थायलंड आपल्या सलामीच्या लढतीत चान पेंग सून आणि गोह लियू यिंग या ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या जोडीवर धक्कादायक मात केली. या दोघांच्या करिअरमधला हा सर्वांत मोठा विजय आहे. भारताच्या या बिगर मानांकित जोडीने मलेशियाची सून - यिंग या पाचव्या मानांकित जोडीला 21-18, 18-21, 21-17 ने धूळ चारली. मलेशियाच्या या जोडीला पराभूत करण्याची पोनप्पा आणि रंकीरेड्डी यांची ही दुसरी वेळ आहे. पोनप्पा-रंकीरेड्डी यांचा सामना आता इंडोनेशियाची जोडी एलफियान एको- मार्शेला इस्लामी यांच्याविरुद्ध होईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)