IPL Auction 2025 Live

IND vs WI Series 2023: वेस्ट इंडिज दौऱ्यावर टीम इंडिया 'या' दिवशी होणार रवाना, बीसीसीआयने रोहित शर्मावर घेतला मोठा निर्णय

तिथे पोहोचल्यानंतर भारतीय संघाला (Team India) परिस्थितीनुसार स्वतःला साचेबद्ध करायला आवडेल. याच कारणामुळे बीसीसीआयने (BCCI) कसोटी मालिका सुरू होण्याच्या 10 दिवस आधी टीम इंडियाला पोहोचवण्याची योजना आखली आहे.

Roht Sharma (Photo Credit - Twitter)

वेस्ट इंडिज आणि भारतीय क्रिकेट संघ (IND vs WI) यांच्यात 12 जुलैपासून कसोटी, एकदिवसीय आणि त्यानंतर टी-20 मालिका सुरू होणार आहे. यासाठी टीम इंडिया 1 जुलैला वेस्ट इंडिजला रवाना होणार आहे. तिथे पोहोचल्यानंतर भारतीय संघाला (Team India) परिस्थितीनुसार स्वतःला साचेबद्ध करायला आवडेल. याच कारणामुळे बीसीसीआयने (BCCI) कसोटी मालिका सुरू होण्याच्या 10 दिवस आधी टीम इंडियाला पोहोचवण्याची योजना आखली आहे. (हे देखील वाचा: IND vs WI 2023: भारत दौरा आणि विश्वचषक पात्रता फेरीमुळे वेस्ट इंडिज संघ अडचणीत, कसोटी मालिकेवर परिणाम होण्याची शक्यता)

प्रथम कसोटी मालिका खेळवली जाईल

वास्तविक, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील पराभवानंतर भारतीय संघ निवांत आहे. खेळाडू विश्रांती घेत आहेत. 1 महिन्याच्या विश्रांतीनंतर टीम इंडिया पुन्हा मैदानात उतरणार आहे. पहिली कसोटी, नंतर एकदिवसीय आणि शेवटची टी-20 सामने खेळवले जातील.

रोहित शर्मा असेल उपलब्ध

पुढील आठवड्यात कोणत्याही दिवशी संघ निवड होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. या दौऱ्यात नवीन खेळाडूंना संधी मिळू शकते. तर वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याची चर्चा आहे. बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, कर्णधार रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त असून तो या दौऱ्यासाठी उपलब्ध असेल.

पहा वेळापत्रक

12 ते 16 जुलै, पहिली कसोटी, डॉमिनिका

20 ते 24 जुलै, दुसरी कसोटी, त्रिनिदाद

27 जुलै, पहिली वनडे, बार्बाडोस

29 जुलै, दुसरी वनडे, बार्बाडोस

1 ऑगस्ट, तिसरी वनडे, त्रिनिदाद

3 ऑगस्ट, पहिली टी-20, त्रिनिदाद

6 ऑगस्ट, दुसरी टी-20, गयाना

8 ऑगस्ट, तिसरी टी-20, गयाना

12 ऑगस्ट, चौथी टी-20, फ्लोरिडा

13 ऑगस्ट, पाचवी टी-20, फ्लोरिडा