Team India 2025 In June: टीम इंडिया जून महिन्यात भिडणार 'या' संघांशी, कधी अन् कोणाविरुद्ध होणार सामना? पाहा 'मेन इन ब्लू'चे वेळापत्रक
टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाईल जिथे दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. मालिकेतील पहिली कसोटी 20 ते 24 जून दरम्यान लाड्समध्ये, दुसरी कसोटी 2 जुलै ते 6 जुलै दरम्यान बर्मिंगहॅममध्ये, तिसरी कसोटी 10 जुलै ते 14 जुलै दरम्यान लंडनमध्ये, चौथी कसोटी 23 ते 27 जुलै दरम्यान मँचेस्टरमध्ये आणि पाचवी कसोटी 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान लंडनमध्ये खेळवली जाईल.
India Cricket Schedule 2025: इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा हंगाम संपला आहे. आता इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारत राष्ट्रीय क्रिकेट संघादरम्यान 20 जूनपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. दोन्ही संघांमधील कसोटी मालिका 20 जून ते 4 ऑगस्ट दरम्यान खेळवली जाईल. टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाईल जिथे दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. मालिकेतील पहिली कसोटी 20 ते 24 जून दरम्यान लाड्समध्ये, दुसरी कसोटी 2 जुलै ते 6 जुलै दरम्यान बर्मिंगहॅममध्ये, तिसरी कसोटी 10 जुलै ते 14 जुलै दरम्यान लंडनमध्ये, चौथी कसोटी 23 ते 27 जुलै दरम्यान मँचेस्टरमध्ये आणि पाचवी कसोटी 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान लंडनमध्ये खेळवली जाईल.
या वर्षी टीम इंडियाला अजूनही 9 कसोटी, 9 एकदिवसीय आणि 13 टी-20 सामने खेळायचे आहेत. प्रथम, टीम इंडिया कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. जिथे टीम इंडियाला पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडियाला बांगलादेशचा दौरा करायचा आहे. जिथे टीम इंडियाला तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 17 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. शेवटचा सामना 23 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. टी-20 मालिका 26 ऑगस्टपासून सुरू होईल, तर शेवटचा सामना 31 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल.
इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिला कसोटी सामना: 20 जून ते 24 जून, दुपारी 3.30, हेडिंग्ले (लीड्स)
दुसरा कसोटी सामना: 2 जुलै ते 6 जुलै, दुपारी 3.30, एजबॅस्टन (बर्मिंगहॅम)
तिसरा कसोटी सामना: 10 जुलै ते 14 जुलै, दुपारी 3.30, लॉर्ड्स (लंडन)
चौथा कसोटी सामना: 23 जुलै ते 27 जुलै, दुपारी 3.30, ओल्ड ट्रॅफर्ड (मँचेस्टर)
पाचवा कसोटी सामना: 31 जुलै ते 4 ऑगस्ट, दुपारी 3.30, केनिंग्टन ओव्हल (लंडन).
(The above story first appeared on LatestLY on Jun 06, 2025 11:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

