भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! ऑगस्ट अखेरीस टी-20 मालिका खेळण्यास BCCI-दक्षिण आफ्रिका बोर्ड तयार
सीएसएचे क्रिकेट संचालक ग्रॅमी स्मिथ आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात या मालिकेबद्दल बोलणी झाली आहे.
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव झाल्यामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. कोविड-19 मुळे आतापर्यंत जगभरात 3 लाखांहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनामुळे, सर्व क्रीडा स्पर्धां होणे अस्पष्ट दिसते आणि क्रीडा परत सुरु होण्याबाबत बरीच अनिश्चितता आहे. या कठीण परिस्थितीत दोन्ही देशांच्या सरकारांनी ग्रीन सिग्नल दिल्यास ऑगस्टच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि भारतमध्ये (India) तीन सामन्यांची टी-20 मालिका करण्यास बीसीसीआय आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका बोर्डाने सहमती दर्शविली आहे. ही मालिका फ्युचर टूर्स प्रोग्रामचा भाग असणार नाही आणि सीएसएचे क्रिकेट संचालक ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith) आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यात या मालिकेबद्दल बोलणी झाली आहे. सध्याची स्थिती पाहता टीम इंडिया आफ्रिका दौऱ्यावर जाणे कठीण दिसत आहे, पण परिस्थिती सुधारल्यास बोर्ड याबाबत निर्णय घेऊ शकते. दक्षिण आफ्रिकेसाठी मालिकेचे आयोजन केल्याने त्यांना आर्थिक मदत होईल आणि भारताविरुद्ध मालिका तयार केल्यास अशा वेळी नफा होईल. (IPL 2020: सप्टेंबर-नोव्हेंबर महिन्यात आयपीएलचे आयोजन करण्यास भारतीय बोर्ड उत्सुक, BCCI सूत्रांची माहिती)
ईएसपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार स्मिथ यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, “आम्ही त्यांच्याशी बोललो आहोत आणि तीन टी-20 करण्याची वचनबद्धता आहे." “अंदाज लावण्याचे एक घटक आहे, ऑगस्टच्या शेवटी कोणत्या गोष्टी कशा असतील हे कोणालाही माहिती नाही. पण आमचा विश्वास आहे की आम्ही सामाजिकदृष्ट्या दूर असलेला खेळ रिक्त स्टेडियममध्ये आपण खेळू शकतो,” असे ते पुढे म्हणाले. यापूर्वी मार्चमध्ये आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर आला होता. पण, एकही सामना न खेळता त्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मायदेशी परतावे लागले.
कोरोना व्हायरसचा दक्षिण आफ्रिका क्रिकेटवर अद्याप फारसा प्रभाव झालेला नाही. अद्याप दोन पैकी कोणत्याही बोर्डाने याबाबत वेळापत्रक जाहीर केलेले नाही. पण, नियिजीत वेळापत्रकानुसार टीम इंडिया जून-जुलैमध्ये 3 सामन्यांची टी-20 आणि नंतर वनडे मालिका खेळण्यास जाणार आहे. श्रीलंका बोर्डदेखील भारतविरुद्ध मालिका आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यानंतर झिम्बाब्वे दौरा, आशिया कप आणि घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध मालिका असा टीम इंडियाचा शेड्युल आहे.