T20 विश्वचषकादरम्यान New Zealand Tour साठी Team India ची होवू शकते घोषणा, युवा खेळाडूंना मिळू शकते संधी
T20 विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ वेगवेगळ्या गटात आहेत.
भारतीय संघ सध्या टी-20 विश्वचषक (T20 WC 2022) खेळत आहे आणि याच दरम्यान बीसीसीआय न्युझीलंड दोऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा (Indian squad announced for New Zealand Tour) करु शकतो. मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा संध्याकाळी न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघाची घोषणा करु शकतात. या दौऱ्यात भारतीय संघाला 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. T20 विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ वेगवेगळ्या गटात आहेत. दोघेही उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत आमनेसामने येऊ शकतात. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विश्वचषकात भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. आधी भारतीय संघाने पाकिस्तानला आणि नंतर नेदरलँड्सचा पराभव केला. मात्र, तिसऱ्या सामन्यात त्यांना दक्षिण आफ्रिकेकडून (IND vs SA) पराभव पत्करावा लागला.
भारताचा न्यूझीलंड दौरा 18 नोव्हेंबरपासून
टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला होणार आहे. त्याचबरोबर भारताचा न्यूझीलंड दौरा 18 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. प्रथम दोघांमध्ये 3 सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. यानंतर 3 एकदिवसीय सामनेही खेळवले जाणार आहेत. या दौऱ्यातून वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. 18, 20 आणि 22 नोव्हेंबरला टी-20 सामने खेळवले जातील. त्याचवेळी, 25, 27 आणि 30 नोव्हेंबर रोजी एकदिवसीय मालिकेचे सामने होणार आहेत. (हे देखील वाचा: IND vs BNG Weather Report: भारताच्या पुढील सामन्यावर पावसाचे संकट, उपांत्य फेरीचे बिघडू शकते समीकरण)
युवा खेळाडूंना मिळू शकते संधी
टी-20 मालिकेतून सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली जावू शकते. तसेच श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू समसन या युवा खेळाडूंना संधी मिळू शकते. शेवटच्या एकदिवसीय मालिकेत शिखर धवनच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंना पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्व स्पर्धेच्या तयारीसाठी संधी देण्यात आली होती. पुन्हा एकदा शुभमन गिलसारख्या युवा खेळाडूला वनडे मालिकेत संधी मिळू शकते.