IND W vs NZ W 1st ODI Scorecard: टीम इंडियाने पहिल्या वनडेत न्यूझीलंडचा 59 धावांनी केला पराभव, राधा यादव ठरली गेम चेंजर; येथे पाहा स्कोरकार्ड
पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 59 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
Indian Women National Cricket Team vs New Zealand Women National Cricket Team: भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना गुरुवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 59 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 12 धावांवर स्मृती मानधनाच्या रूपाने संघाला पहिला मोठा धक्का बसला. संपूर्ण भारतीय संघ 44.3 षटकात अवघ्या 227 धावांवर गारद झाला.
येथे पाहा स्कोरकार्ड
टीम इंडियासाठी अनुभवी अष्टपैलू दीप्ती शर्माने 41 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान दीप्ती शर्माने 50 चेंडूंत दोन चौकार आणि एक षटकार ठोकला. दीप्ती शर्माशिवाय तेजल हसबनीसने 42 धावा केल्या. त्याचवेळी जेस केरने न्यूझीलंड संघाला पहिले यश मिळवून दिले. न्यूझीलंडसाठी स्टार अष्टपैलू अमेलिया केरने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. अमेलिया केरशिवाय इडन कार्सन आणि जेस केरने प्रत्येकी दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंड संघाला 50 षटकात 228 धावा करायच्या होत्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची वाईट सुरुवात
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 79 धावा करून संघाचे चार फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 40.4 षटकात अवघ्या 168 धावांवर गारद झाला. न्यूझीलंडकडून मॅडी ग्रीनने सर्वाधिक 31 धावांची खेळी खेळली. मॅडी ग्रीनशिवाय लॉरेन डाऊनने 26, जॉर्जिया प्लिमरने 25 आणि अमेलिया केरने नाबाद 25 धावा केल्या.
राधा यादवने घेतल्या सर्वाधिक तीन विकेट
सायमा ठाकोरने सुझी बेट्सच्या रूपाने टीम इंडियाला पहिले मोठे यश मिळवून दिले. टीम इंडियाकडून राधा यादवने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. राधा यादवशिवाय सायमा ठाकोरने दोन बळी घेतले. टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रविवार, 27 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी 1.30 वाजल्यापासून खेळवला जाईल.