Three Stars on the Indian Team Jersey: श्रीलंकेविरुद्ध थ्री स्टार जर्सीत दिसली टीम इंडिया, जाणून घ्या काय आहे त्याच रहस्य
IND vs SL: मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची (Gautam Gambhir) ही पहिली एकदिवसीय मालिका आहे, ज्यातील पहिला सामना बरोबरीत सुटला होता. पण एका गोष्टीने भारतीय क्रिकेट चाहत्यांना विचार करायला भाग पाडले. भारतीय संघाच्या जर्सीवर ते तीन स्टार होते.
IND vs SL 1st ODI: विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-20 विश्वचषक 2024 नंतर एका महिन्यानंतर भारतीय संघात परतले आहेत. हे दोघेही श्रीलंका दौऱ्यावर होणाऱ्या तीन सामन्यांच्या द्विपक्षीय वनडे मालिकेसाठी संघाचा भाग आहेत. याशिवाय श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि केएल राहुल (KL Rahul) यांचेही भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची (Gautam Gambhir) ही पहिली एकदिवसीय मालिका आहे, ज्यातील पहिला सामना बरोबरीत सुटला होता. पण एका गोष्टीने भारतीय क्रिकेट चाहत्यांना विचार करायला भाग पाडले. भारतीय संघाच्या जर्सीवर ते तीन स्टार होते. (हे देखील वाचा: Arshdeep Singh Trolled: अती शहानपणा नडला! अर्शदीप सिंगच्या चुकीमुळे गमवावा लागला सामना; चाहत्यांनी सोशल मीडियावर फटकारले; पाहा)
भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर तीन स्टार का?
भारतीय क्रिकेट संघाची नवीन जर्सी पाहून चाहते संभ्रमात पडले आहेत. या जर्सीला तीन स्टार आहेत, तर काही दिवसांपूर्वी झालेल्या टी-20 मालिकेत दोनच स्टार्स होते. भारताने आतापर्यंत फक्त दोनदाच एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे, मग तीन स्टार्स का? वास्तविक, हे तीन स्टार भारताच्या तीन मोठ्या स्पर्धा जिंकण्याचे प्रतीक आहेत. भारताने 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. यानंतर 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले. याशिवाय भारताने 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ किंवा जर्सी निर्मात्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
श्रीलंकेविरुद्धचा पहिला सामना राहिला अनिर्णित
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांकाने 75 चेंडूत 56 धावा केल्या तर दुनिथ वेललागे 65 चेंडूत नाबाद 67 धावा केल्या. श्रीलंकेने 50 षटकात 8 गडी गमावून 230 धावा केल्या आणि भारताला 231 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात भारतीय संघाची फलंदाजी ढासळल्याचे दिसून आले. याशिवाय केएल राहुल आणि अक्षर पटेल यांनाच 30 धावांचा टप्पा पार करता आला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत भारतीय संघाला 47.5 षटकांत 230 धावांत गुंडाळून सामना बरोबरीत सोडवला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)