IND vs AUS 4th Test 2024: आर अश्विनच्या जागी तनुष कोटियनचा भारतीय संघात होऊ शकतो समावेश, मेलबर्न कसोटीत मिळणार संधी?
रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीनंतर बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी टीम इंडियात जागा रिक्त झाली आहे. तनुषने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. तो मुंबईचा अष्टपैलू खेळाडू आहे.
India Natioanl Cricket Team vs Australia Men's Cricket Team: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना (IND vs AUS 4th Test 2024) मेलबर्न (Melbourne Cricket Ground) येथे होणार आहे. याआधी टीम इंडियामध्ये मोठा बदल होऊ शकतो. भारतीय संघात तनुष कोटियनचा (Tanush Kotian) समावेश होऊ शकतो. रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीनंतर बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी (Border-Gavaskar Trophy 2024-25) टीम इंडियात (Team India) जागा रिक्त झाली आहे. तनुषने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. तो मुंबईचा अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र, त्याच्या संघात सामील झाल्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. (हे देखील वाचा: Mohammed Shami Fitness Update: चाहत्यांसाठी वाईट बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मोहम्मद शमी जाणार नाही; BCCI ने दिले अपडेट)
तनुष फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू
मिळालेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय तनुष कोटियनला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मेलबर्नला पाठवू शकते. तो मुंबईकडून खेळतो. तनुष हा फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. तनुषने प्रथम श्रेणीत 100 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने शतकही ठोकले आहे. यासोबतच त्याने लिस्ट ए मध्येही चांगली कामगिरी केली आहे. अश्विनच्या जाण्यानंतर टीम इंडियामध्ये सध्या एक जागा रिक्त आहे. त्यामुळे त्याला संधी मिळू शकते.
तनुषने देशांतर्गत क्रिकेटमध्ये केली दमदार कामगिरी
तनुषने आतापर्यंत 33 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या कालावधीत 101 विकेट्स घेतल्या आहेत. एका डावात 58 धावांत 5 बळी घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. तनुषने या फॉरमॅटच्या 47 डावांमध्ये 1525 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 2 शतके आणि 13 अर्धशतके केली आहेत. नाबाद 120 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याने 20 लिस्ट ए सामन्यांमध्ये 20 विकेट घेतल्या आहेत आणि टी-20 फॉरमॅटमध्येही चांगली कामगिरी केली आहे.
आतापर्यंतचा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचा निकल
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. भारताने पहिला सामना 295 धावांनी जिंकला होता. ऑस्ट्रेलियाने दुसरी कसोटी 10 गडी राखून जिंकली. तर तिसरी कसोटी अनिर्णित राहिली. आता कसोटी मालिकेतील चौथा सामना 26 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. त्यानंतर 3 जानेवारीपासून शेवटची कसोटी सामना होणार आहे.