Team India T20I Schedule: टी-20 विश्वचषक संपला, आता टीम इंडिया करणार या देशाचा दौरा; तारीख आणि वेळ लक्षात ठेवा
या दौऱ्यात भारताला 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. भारताचा झिम्बाब्वे दौरा 6 जुलैपासून सुरू होत असून मालिकेतील शेवटचा सामना 14 जुलै रोजी होणार आहे.
IND vs ZIM T20I Series: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने बार्बाडोसमध्ये तिरंगा फडकवत टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. टी-20 चा नवा चॅम्पियन बनल्यानंतर भारतीय संघाचा पहिला दौरा झिम्बाब्वेचा आहे. या दौऱ्यात भारताला 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. भारताचा झिम्बाब्वे दौरा 6 जुलैपासून सुरू होत असून मालिकेतील शेवटचा सामना 14 जुलै रोजी होणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. शुभमन गिल भारताचा नवा कर्णधार असेल. टी-20 विश्वचषकानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंनी या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. (हे देखील वाचा: World Cup Celebrations In New York: न्यूयॉर्कमध्ये भारतीय चाहत्यांनी केला विजयाचा जल्लोष, सामना पाहताना दिला गणपती बाप्पा मोरयाचा नारा (Watch Video)
संघात समाविष्ट असलेल्या एकूण 15 भारतीयांपैकी शिवम दुबे, संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल हे फक्त 3 जण या दौऱ्यावर जाणार आहेत. उर्वरित खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. बीसीसीआयने या दौऱ्यासाठी संघ जाहीर केला आहे. आयपीएल स्टार रियान पराग आणि अभिषेक शर्मा या खेळाडूंनाही झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संधी मिळाली आहे. या दौऱ्यात रिंकू सिंग आणि खलील अहमद या टी-20 विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंमध्ये स्थान मिळाले आहे.
झिम्बाब्वेचा भारत दौरा 2024 वेळापत्रक
6 जुलै - पहिला टी-20, हरारे स्पोर्ट्स क्लब, दुपारी 4:30 वा
7 जुलै - दुसरा टी-20, हरारे स्पोर्ट्स क्लब, दुपारी 4:30 वा
10 जुलै - तिसरा टी-20, हरारे स्पोर्ट्स क्लब, रात्री 9:30 वा
13 जुलै - चौथा टी-20, हरारे स्पोर्ट्स क्लब, दुपारी 4:30 वा
14 जुलै - पाचवा टी-20, हरारे स्पोर्ट्स क्लब, 4:30 वा
भारतीय संघ झिम्बाब्वे दौरा- शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिवम दुबे, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे.