T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान ‘या’ सात ठिकाणी होणार सामने, मेलबर्नमध्ये रंगणार फायनलचा ‘महासंग्राम’
आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघाला मायदेशी आपले विजेतेपद राखण्याची संधी असेल. आयसीसीने टी-20 वर्ल्ड कप 2022 स्पर्धेचे सर्व सामने खेळले जातील अशा सात ठिकाणांची घोषणा केली आहे. 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत अॅडिलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2022 मध्ये एकूण 45 सामने खेळले जातील.
आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 चॅम्पियन ऑस्ट्रेलियन (Australia) संघाला मायदेशी आपले विजेतेपद राखण्याची संधी असेल. आयसीसीने टी-20 वर्ल्ड कप 2022 स्पर्धेचे सर्व सामने खेळले जातील अशा सात ठिकाणांची घोषणा केली आहे. 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत अॅडिलेड (Adelaide), ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी (Sydney) येथे होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2022 मध्ये एकूण 45 सामने खेळले जातील. स्पर्धेचा अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर (Melbourne Cricket Ground) खेळला जाईल. तसेच उपांत्य फेरीचे सामने अनुक्रमे सिडनी क्रिकेट ग्राउंड आणि अॅडिलेडच्या ओव्हल मैदानावर 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी आयोजित केले जातील. पुरुष टी-20 विश्वचषक 2021 चॅम्पियन ऑस्ट्रेलिया आणि उपविजेता न्यूझीलंड (New Zealand) तसेच अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, भारत (India), पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी पुढील सर्वोच्च स्पर्धेच्या सुपर 12 टप्प्यात थेट प्रवेश मिळवला आहे. (T20 World Cup 2021 Prize Money: ऑस्ट्रेलियाच्या 13 कोटींची बक्षीस रक्कम, न्यूझीलंड खेळाडूही झाले मालामाल)
नामिबिया, स्कॉटलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज पहिल्या फेरीद्वारे स्पर्धेत सामील होतात. स्पर्धेसाठी अंतिम चार स्पॉट्स दोन पात्रता स्पर्धांद्वारे भरले जातात: एक ओमानमध्ये फेब्रुवारीमध्ये आणि एक जून आणि जुलै दरम्यान झिम्बाब्वेमध्ये. “लाइन-अपमध्ये 12 संघ आधीच निश्चित झाले आहेत, इतर कोणते संघ सामील होतील हे पाहण्यासाठी आम्ही पात्रता प्रक्रियेच्या समाप्तीची आतुरतेने वाट पाहत आहोत,” स्पर्धेचे प्रमुख क्रिस टेटली यांनी सांगितले. “आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी स्पर्धांचे पुनरागमन पाहण्यास उत्सुक आहोत आणि आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2022 साठी सात यजमान शहरांची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. 2020 मध्ये आयसीसी महिला टी-20 विश्वचषक यशस्वी झाल्यानंतर आणि दोन वर्ष पुढे ढकलण्यात आल्याने, आमची दृष्टी आता स्थानिक आयोजन समितीच्या सहकार्याने 2022 च्या कार्यक्रमाच्या नियोजनावर निश्चित आहे.”
टी-20 विश्वचषक 2022 संबंधित महत्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे
स्पर्धेचे आयोजन: 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2022
स्पर्धेचे ठिकाण: अॅडिलेड, ब्रिस्बेन, होबार्ट, मेलबर्न, पर्थ, सिडनी आणि गिलॉन्ग
सुपर-12 मधील थेट पात्रता संघ: ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश
पहिल्या फेरीसाठी पात्र ठरलेले संघ: श्रीलंका, वेस्ट इंडिज, स्कॉटलंड, नामिबिया
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)