T20 World Cup 2021 Points Table: सुपर-12 मध्ये नामिबियाची दमदार सुरुवात, स्कॉटलंडला पराभूत करत भारत-न्यूझीलंडवर ठरला वरचढ, पहा पॉईंट टेबल

यासह स्पर्धेपूर्वी चाहत्यांनी ज्याचा विचार केला नसेल ते आता घातले आहे. हे प्राथमिक निकाल असले तरी नामिबिया आता गट 2 च्या गुणतालिकेत भारत आणि न्यूझीलंडच्या वरचढ ठरला आहे.

नामिबिया क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/T20WorldCup)

अबू धाबीच्या (Abu Dhabi) शेख जायद क्रिकेट स्टेडियमवर बुधवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात नामिबियाने (Namibia) स्कॉटलंडवर (Scotland) चार विकेट्सने विजय मिळवून त्यांच्या सुपर 12 मोहिमेची स्टाईलमध्ये सुरुवात केली. वेगवान गोलंदाज रुबेन ट्रम्पेलमन आणि जेन फ्रायलिंक यांच्या दमदार गोलंदाजीमुळे नामिबियाने बुधवारी आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) स्पर्धेच्या सुपर 12 टप्प्यातील गट 2 च्या आपल्या पहिल्या सुपर-12 सामन्यात स्कॉटलंडचा चार गडी राखून पराभव केला. पहिल्याच षटकात तीन विकेट घेणारा ट्रम्पेलमन (17 धावांत 3 बळी) आणि फ्रायलिंक (10 धावांत 2 बळी) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर स्कॉटलंड संघ आठ बाद 109 धावाच करू शकला. सहावा सामना खेळणाऱ्या ट्रम्पमनची कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यासह स्पर्धेपूर्वी चाहत्यांनी ज्याचा विचार केला नसेल ते आता घातले आहे. हे प्राथमिक निकाल असले तरी नामिबिया आता गट 2 च्या गुणतालिकेत भारत (India) आणि न्यूझीलंडच्या (New Zealand) वरचढ ठरला आहे. (T20 World Cup 2021, SCO vs NAM: नामिबियाचा वर्ल्ड कप सुपर-12 मध्ये पहिला विजय, स्कॉटलंडवर केली 4 विकेट्सने मात)

टी-20 विश्वचषकच्या गट 2 बद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तान संघाने गेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवून सेमीफायनल फेरीत आपला प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. पाकिस्तानचे एकूण 4 गुण ते पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. यानंतर अफगाणिस्तान आणि नामिबिया संघ प्रत्येकी 2 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. उल्लेखनीय आहे की गट 2 मधील विजेत्या संघांपैकी अफगाणिस्तानचा नेट रनरेट सर्वोत्तम (+6.500) आहे. याशिवाय नामिबियाच्या स्कॉटलंडविरुद्ध विजयाने न्यूझीलंड आणि टीम इंडियाला गुणतालिकेत आणखी पिछाडीवर ढकलले आहे. भारत, न्यूझीलंड या दोन्ही संघांनी पाकिस्तानविरुद्ध स्पर्धेत आपला सलामीचा सामना खेळला आणि त्यांना पराभव पत्करावा लागला. या गटात भारतीय संघाची कठीण परिस्थितीत सापडला आहे. त्यांना पाकिस्तानविरुद्ध मोठ्या प्रभावामुळे त्यांचा नेट रनरेट -0.973 आहे.

अशा स्थितीत सेमीफायनल प्रवेश करण्यासाठी आता त्यांना त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकणे गरजेचे आहे. इथून एक पराभव टीम इंडियाची वाट आणखी बिकट होऊ शकते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवार, 31 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. न्यूझीलंडनंतर भारताची 3 नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तान, 5 नोव्हेंबर रोजी स्कॉटलंड आणि 8 नोव्हेंबर रोजी नामिबियाशी टक्कर होणार आहे. त्यामुळे उर्वरित सर्व सामना ‘विराटसेने’साठी आर या पारचे असणार आहेत.