T20 World Cup: असगर ‘अफगाण’साठी अंतिम सामन्यासाठी मैदानात, नामिबिया खेळाडूंना दिला ‘गार्ड ऑफ ऑनर’, विश्वचषकदरम्यान केली निवृत्तीची घोषणा; पहा Video
रहमानुल्ला गुरबाजला 10व्या षटकात लॉफ्टी-ईटनने बाद केले आणि त्यानंतर असगर अफगाण फलंदाजीला आला. मैदानात उतरताना त्याला नामिबियाच्या खेळाडूंकडून तसेच त्याचा देशबांधव मोहम्मद शहजाद याच्याकडून गार्ड ऑफ ऑनर मिळाला.
अफगाणिस्तानचा (Afghanistan) अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार असगर अफगाणला (Asghar Afghan) त्याच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्याच्या निमित्ताने नामिबिया (Namibia) संघाने गार्ड ऑफ ऑनर देऊन त्याचा सन्मान केला. शेख जायद क्रिकेट स्टेडियम अबू धाबी (Abu Dhai) येथे आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक (ICC Men's World Cup) 2021 च्या सामन्यापूर्वी असगर अफगाणने घोषित केले की तो 31 ऑक्टोबर 2021 रोजी अफगाणिस्तानसाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने शनिवारी आपल्या ट्विटर हँडलवर याची घोषणा केली. “अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगाणने नामिबियाविरुद्धच्या सामन्यानंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे,” असे बोर्डाने लिहिले. (AFG vs NAM, T20 WC 2021: अफगाणिस्तानने नामिबियाला दिले 161 धावांचे लक्ष्य; मोहम्मद शहजाद, Asghar Afghan आणि हजरतुल्ला झझईची शानदार खेळी)
रहमानुल्ला गुरबाजला 10व्या षटकात लॉफ्टी-ईटनने बाद केले आणि त्यानंतर असगर अफगाण फलंदाजीला आला. मैदानात उतरताना त्याला नामिबियाच्या खेळाडूंकडून तसेच त्याचा देशबांधव मोहम्मद शहजाद याच्याकडून गार्ड ऑफ ऑनर मिळाला. आपल्या अंतिम आंतरराष्ट्रीय सामन्यात अफगाणिस्तानच्या माजी कर्णधाराने नामिबियाविरुद्ध 23 चेंडूत 31 धावांची तडाखेबाज डाव खेळला. “अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगाण, ज्याने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळवून भारतीय दिग्गज धोनीला एका अतिरिक्त विजयाने मागे टाकले, @T20WorldCup येथे नामिबिया विरुद्ध अफगाणिस्तानच्या तिसऱ्या सामन्यात क्रिकेटच्या सर्व स्वरूपांना अलविदा करण्याचा निर्णय घेतला,” अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने शनिवारी ट्विट केले.
असगर अफगाण हा अफगाणिस्तानच्या आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. त्याने 6 कसोटी, 114 एकदिवसीय आणि 75 T20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 4215 धावा केल्या आहेत आणि 115 सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचे नेतृत्व केले आणि कर्णधार म्हणून सर्वाधिक 42 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. यापूर्वी हा विक्रम एमएस धोनीच्या (41 विजय) नावावर होता. पण असगरने या वर्षी मार्चमध्ये त्याच्या नेतृत्वात अफगाणिस्तानसाठी 42 सामने जिंकले होते. पूर्वी अस्गर स्टॅनिकझाई या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या क्रिकेटपटूने 2004 मध्ये युद्धग्रस्त देशासाठी अंडर-19 क्रिकेट खेळून पहिले ठसा उमटवला. जसजशी वर्षे उलटली तसतसा तो वरिष्ठ संघाच नियमित खेळाडू बनला. त्याला सर्व फॉरमॅटमध्ये अफगाणिस्तानचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. 2018 मध्ये बेंगलोर येथे भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात त्याने अफगाणिस्तानचे नेतृत्व केले होते.