T20 World Cup 2021: धोनीच्या भरवशाच्या अष्टपैलूने नंबर 1 फलंदाजाचे गणित बिघडवले, टी-20 विश्वचषकातील स्थान आले धोक्यात
टी-20 क्रिकेटचा नंबर वन फलंदाज डेविड मलानवर टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यातून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली आहे. इंग्लंडकडून खेळताना दोन्ही सराव सामन्यात मलान अपयशी ठरला. अशा स्थितीत आता त्याच्या जागी मोईन अलीला नंबर-3 वर संधी दिली जाऊ शकते. मोईनने इंडियन प्रीमियर लीग 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी चमकदार कामगिरी केली आहे.
टी-20 क्रिकेटचा नंबर वन फलंदाज डेविड मलानवर (Dawid Malan) टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्या सामन्यातून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली आहे. इंग्लंड (England) कडून खेळताना दोन्ही सराव सामन्यात मलान अपयशी ठरला. अशा स्थितीत आता त्याच्या जागी मोईन अलीला नंबर-3 वर संधी दिली जाऊ शकते. मोईनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 मध्ये धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) साठी चमकदार कामगिरी केली आहे. याशिवाय तो फिरकी गोलंदाजीत देखील संघाला समतोलही मिळवून देईल. इंग्लंड क्रिकेट संघ टी-20 विश्वचषक जेतेपदाची दावेदारांपैकी एक आहे. पण स्पर्धेतील सराव सामन्यांनी या संघाची डोकेदुखी वाढवली आहे. इंग्लंडने बुधवारी दुसऱ्या सराव सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. तर पहिल्या सराव सामन्यात टीम इंडियाने (Team India) 7 गडी राखून पराभव केला होता. वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा सामना वेस्ट इंडिजशी शनिवारी, 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. (T20 World Cup 2021: इंग्लंड कर्णधार Eoin Morgan ‘या’ कारणामुळे स्वतःला वर्ल्ड कप संघातून वगळण्यास सज्ज)
मलानच्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर त्याने 30 सामन्यांमध्ये 43 च्या सरासरीने 1123 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 139 राहिला आहे, जो खूप चांगला आहे. यादरम्यान त्याने एक शतक आणि 11 अर्धशतके केली आहेत. याशिवाय, टी-20 वर्ल्ड कपच्या सराव सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध त्याला 15 चेंडूत फक्त 11 धावा करता आल्या. यापूर्वी भारताविरुद्ध तो 18 चेंडूत फक्त 18 धावा करू शकला होता. दुसरीकडे, दुसऱ्या सराव सामन्यात मोईन अलीला विश्रांती देण्यात आली होती. त्याने पहिल्या सराव सामन्यात भारताविरुद्ध 20 चेंडूत 43 धावांची नाबाद खेळी केली होती. अशा स्थितीत त्याला संघात समाविष्ट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 2016 टी-20 विश्वचषकानंतर पॉवर-प्लेबद्दल बोलायचे झाले तर, मोईन अलीचा स्ट्राईक रेट 126 आहे, तर मालनचा फक्त 115 आहे. मोईन अलीने आयपीएल फायनलमध्येही आक्रमक खेळी खेळली आणि एमएस धोनीच्या टीमला चॅम्पियन बनवण्यात त्याचा मोलाचा वाटा होता.
मलान सुरुवातीला 10-15 चेंडू घेतो. तसेच यूएईच्या संथ खेळपट्ट्या त्याच्या फलंदाजीसाठी योग्य नाही. यामुळे सराव सामन्यांमध्ये मलानला धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला. तसेच आंतरराष्ट्रीय टी-20 सामने वगळले तर मलानच्या आकडेवारीचा फारसा परिणाम होत नाही. यंदा त्याने 33 टी-20 सामन्यांमध्ये त्याची सरासरी केवळ 24.5 आहे. अशा स्थितीत मालनचे स्थान धोक्यात आले आहे. मलानला संघातून वगळल्याने इंग्लंडला संघात अतिरिक्त अष्टपैलू खेळवण्याची संधी मिळेल. जर मलान बाहेर पडला तर एकतर क्रिस वोक्स किंवा डेविड विली सातव्या क्रमांकावर खेळू शकतात तर मोईनला तीन किंवा चौथ्या क्रमांकावर बढती दिली जाऊ शकते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)