T20 World Cup 2021: रोहित शर्माचा सलामी साथीदार कोण असणार, माजी भारतीय दिग्गजाने विराट कोहलीच्या वर ‘या’ खेळाडूवर लावला दाव
टी-20 विश्वचषक स्पर्धेत रोहितच्या जोडीदारासाठी कोहली आणि राहुल यांच्यात चुरशीची स्पर्धा होऊ शकते, असा विश्वास भारताचा माजी सलामीवीर आकाश चोपडा यांनी व्यक्त केला.
बीसीसीआय (BCCI) यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात युएई व ओमान येथे टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेचे आयोजन करणार आहे आणि भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) या फॉरमॅटमध्ये सलामीला मैदानात उतरू शकतो याबाबत संकेत दिले आहेत. म्हणजे कोहली सलामीला आला तर तो रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासोबत टीम इंडियाच्या (team India) डावाची सुरुवात करू शकतो. तथापि, संघ व्यवस्थापन रोहितचा साथीदार म्हणून कोहली व्यतिरिक्त इतर पर्यायांवर विचार करू शकतो. आणि यामध्ये सलामीवीर केएल राहुलही (KL Rahul) या शर्यतीत आघाडीवर असू शकतो. टी-20 विश्वचषक स्पर्धेत रोहितच्या जोडीदारासाठी कोहली आणि राहुल यांच्यात चुरशीची स्पर्धा होऊ शकते, असा विश्वास भारताचा माजी सलामीवीर आकाश चोपडा (Aakash Chopra) यांनी व्यक्त केला. (T20 World Cup 2021 Schedule: यूएई आणि ओमान येथे रंगणार टी-20 वर्ल्ड कपचा थरार, ICC कडून शिक्कामोर्तब)
त्याच्या युट्यूब चॅनेलवर चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना चोपडा यांना रोहित शर्मा एक स्वयंचलित निवड असल्याचे सांगत भारताच्या सलामी खेळाडूंसाठ चार पर्यायी नावे दिली. “भारताकडे अनेक पर्याय आहेत. शिखर धवन एक आहे, केएल राहुल दुसरा आहे आणि त्यानंतर तुम्हाला विराट कोहलीही मिळाला आहे. आणि मी पृथ्वी शॉ सामील करेन. तो ज्या क्रिकेटचा खेळत असतो तो आश्चर्यकारक आहे, प्रत्येक सामन्यात तो धावा करेल हे आवश्यक नाही पण ज्या दिवशी तो करेल तो अटळ असेल,” चोपडा म्हणाले. तथापि माजी सलामीवीर म्हणाले की, कदाचित कोहली आणि राहुल यांच्यात स्पार्धा मनोरंजक होईल.
“शेवटी राहुल आणि कोहली यांच्यात नाणेफेक होण्याची शक्यता आहे. राहुल कदाचित ही शर्यत जिंकू शकेल कारण आता पंत मधल्या फळीत येईल म्हणून राहुलला ती भूमिका करण्याची गरज नाही. हार्दिक पंड्या, पंत आणि रवींद्र जडेजा हे मधल्या फळीत कामगिरी बजावू शकतात. त्यामुळे मी राहुलला आघाडीवर खेळेन आणि कोहलीला ऑर्डरनुसार 3 किंवा इतर मार्गाने खेळेन,” चोपडा पुढे म्हणाले. टी-20 मध्ये निवडसाठी राहुल आणि रोहित हे दोघेही भारताचे आघाडीचे सलामीवीर असतील. इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत रोहित सर्व सामन्यांमध्ये सलामीला उतरला तर राहुलने त्याला तीनदा साथ दिली. पहिल्या सामन्यानंतर धवनकडे दुर्लक्ष करण्यात आले.